• अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
  • अंथरूण पाहून पाय पसरावे
  • अक्कल खाती जमा.
  • अग अग म्हशी, मला कुठे नेशी.
  • अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी
  • अडली गाय खाते काय.
  • अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा
  • अती झालं अऩ हसू आलं.
  • अती झाले गावचे अन पोट फुगले देवा
  • अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  • अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
  • असतील मुली तर पेटतील चुली.
  • आंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
  • आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  • आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
  • आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
  • आधी पोटोबा मग विठोबा
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  • आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत
  • आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  • उंटावरचा शहाणा
  • उंटावरून शेळ्या हाकणे
  • एका हाताने टाळी वाजत नाही
  • कर नाही त्याला ड़र कशाला?
  • करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
  • करावे तसे भरावे.
  • कळते पण वळत नाही.
  • कशात काय अन फाटक्यात पाय.
  • कष्ट करणार त्याला देव देणार.
  • काखेत कळसा गावाला वळसा
  • काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
  • कामापुरता मामा
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
  • कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
  • कोल्हा काकडीला राजी
  • खायला काळ भुईला भार
  • गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
  • गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.
  • गाढवाला गुळाची चव काय
  • गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
  • घोडामैदान जवळ आहे
  • चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
  • चांदणे चोराला, उन घुबडाला.
  • चांभाराची नजर जोड्यावर.
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
  • चुकलेला फकीर मशिदीत.
  • चोर तो चोर वर शिरजोर.
  • चोर नाही तर चोराची लंगोटी.
  • चोर सोडून संन्याशाला सुळी.
  • चोराच्या उलट्या बोंबा.
  • चोराच्या मनांत चांदणं.
  • चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
  • चोरावर मोर.
  • चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
  • छत्तीसचा आकडा
  • जशास तसे.
  • जशी कामना तशी भावना.
  • जशी देणावळ तशी धुणावळ.
  • जशी नियत तशी बरकत.
  • जसा गुरु तसा चेला.
  • जसा भाव तसा देव.
  • जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
  • जावयाचं पोर हरामखोर.
  • जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
  • जिकडे सुई तिकडे दोरा.
  • जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
  • जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
  • जो श्रमी त्याला काय कमी.
  • ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
  • ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
  • झाकली मूठ सव्वा लाखाची
  • डोंगर पोखरून उंदीर कढणे
  • तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
  • तहान लागल्यावर आड खणणे.
  • ताकापुरते रामायण.
  • तेरड्याचा रंग तीन दिवस
  • तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार
  • दुष्काळात तेरावा महिना
  • नव्याचे नऊ दिवस
  • नाकापेक्षा मोती जड होणे
  • नाचता येईना अंगण वाकडे
  • नाव मोठे लक्षण खोटे
  • नावडतीचे मीठ अळणी
  • पाण्यात राहून माशाशी वैर
  • पायीची वहाण पायी बरी
  • पालथ्या घड्यावर पाणी
  • पी हळद हो गोरी
  • बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
  • भरंवशाच्या म्हशीला टोणगा
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
  • मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
  • रात्र थोडी सोंगे फार
  • वरातीमागून घोडे
  • वासरात लंगडी गाय शहाणी
  • शेरास सव्वाशेर
  • हपापाचा माल गपापा