भरलेले कारले

कारली 8-10 नग
मसाल्याकरिता साहित्य:-
किसलेला गुळ अर्धा वाटी
आमचुर पावडर पाव चमचा
आलं लसूण पेस्ट 1 चमचा
हळद, साखर, मीठ चवीनुसार
तिखट चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
तेल –

कृती:-

सर्व प्रथमकारली धुवून त्याचा बरचा टोकदार भाग सोलून घ्यावा. नंतर कारलं मधोमध कापून पाण्यात 15-20 मिनिट ठेवा. ते फुलल्यानंतर त्याच्या बियांचा आतला गर काढून घेणे. नंतर मसाल्याचे साहित्य एकत्र करुन हा मसाला कराल्यामध्ये भरावा नंतर त्याला एक दोरा गुंडाळून ठेवावा. एका कढाईत तेल घेऊन तेलाच्या वर बसेल अशी जाळी त्यावर ठेवावी तेल ताळीला लागणार नाही याची दक्षता घ्यावी. नंतर या जाळीवर कारले ठेवून तेलाचा जो धूर निघतो त्यांवर 15-20 मिनिटे शिजवावी.

प्रकार 2 रा:- दोरा बांधलेली कारली काॅर्नफ्लोअर आणि मैद्याच्या द्रावणात बुडवून डीप फ्राय करावे. व मधोमध दोन-तीन तुकडे करुन खायला द्यावे.
प्रकार 3 रा:- मसाला भरुन कारली तयार झाल्यानंतर त्याला दोरा बांधून ती तव्यावर थोडीशी शेलो फ्राय करावी.

भरलेलं कोहळं

साहित्य:-

छोटं कोहळं अंदाजे 3 ते 4 इंच असलेलं
खवा अर्धा वाटी
भाजून वाटलेली खसखस 3 चमचे
आलं-लसूण पेस्ट 3 चमचे
हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
काजूचे तुकडे 4-5
मनुका 4-5
लिंबाचा रस 2 चमचे
मीठ, साखर चवीनुसार
तेल तळायला
कच्च्या कांद्याची पेस्ट 1 वाटी
कोथिंबीर, आलं, खोबरं 1 वाटी

कृती:-

कोहळं वरुन हलकेच कापून त्यातील आतला गर काढून टाकावा व आतल्या भागाला मीठ-लिंबू चोळून ठेवावा. खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, काजू, किसमिस, खवा, मीठ, साखर घालून हा मसाला कोहळयात भरावा. वरुन कणकेच्या पेस्टच्या साहाय्याने झाकण लावावे, असे भरलेले कोहळे व त्यावरचे झाकण घट्ट बसेल असे तयार करुन ठेवावे. त्यासाठी टूथ पीकचा वापर करा. तेल मध्यम गरम करावा. त्यात हे कोहळे हलकेच ठेवून मंद आचेवर तळावे, नंतर चाळणीवर ठेवून निथळू द्यावे.

पेंडपाल्याची भाजी

पेंडपाला हा मराठवाडयातील प्रसिद्ध प्रकार आहे. या भाजी प्रकारात प्रत्येक्ष भाज्या नसतात. तरीपण चवीला उत्कृष्ट लागतो.

साहित्य –

उडद डाळ अर्धी वाटी
मुग डाळ अर्धी वाटी
चणा डाळ अर्धी वाटी
मसुर डाळ अर्धी वाटी
कारळाची पूड पाऊण वाटी
चिरलेला कांदा अर्धी वाटी
लसूण पाकळया 5-6
हळद पाव चमचा
हिंग पाव चमचा
हिरवी मिरची 4-5
मीठ चवीनुसार
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

सर्व प्रथम डाळी धुऊन त्याचे वरण तयार करुन घ्या. शिजवतांना थोडे पाणी कमीच घाला. कारळे भाजून त्याची पूड तयार करुन ठेवा. एका पॅनमध्ये कांदा फोडणीला घालून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, हळद, तिखट, हिंग घालून नंतर शिजवलेली डाळ घाला. एकत्र करुन चवीनुसार मीठ व आवडत असल्यास आंबट-गोड घाला. नंतर कोथिंबीर व कारळाची पूड घालून घोटून घ्या. भाकरी बरोबर सव्र्ह करा.
यांचे वरण तयार करावे. कारळाची भाजून तयार केलेली पूड पाऊण वाटी

कैरी भात

साहित्य:-

तयार भात 2 वाटया
किसलेला कैरी 1 वाटी
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर –
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
लसूण 1 चमचा
हळद, हिंग पाव चमचा

कृती:-

भात थंड पाण्याच्या हाताने मोकळा करुन त्यात किसलेली कैरी, मीठ, साखर, कोथिंबीर एकत्र करुन घेणे. त्यानंतर कढईमध्ये तेल घेवून त्यात मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण घालून परतणे. गॅस बंद करुन त्यात हळद व हिंग घालणे. नंतर ही फोडणी तयार केलेल्या भातावर ओतून कालवून घेणे व नंतर सव्र्ह करणे.

फक्की

हा प्रकार वेळ नसतांना पोट भरायचे असेल किंवा प्रवासात काहीतरी पौष्टिक व पोट भरले असे खायचे असेल त्यासाठी उपयुक्त प्रकार आहे.

साहित्य –

कणीक 1 वाटी
तूप अर्धी वाटी
गूळ अर्धी वाटी
मीठ चिमूटभर
वेलची पावडर अर्धा चमचा

कृती –

कणीक अर्धी तूपात छान सोनेरी रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यामधे किसलेला गुळ, मीठ व वेलची पावडर घालून एकत्र करुन डब्ब्यात भरुन ठेवा.
टीप – हा पदार्थ थंड दूधामध्ये एकत्र करुन खाल्ला तरी छान वाटतो.