अंबाडीची भाजी

साहित्य –

अंबाडीची भाजी 1 जूडी
तांदूळाच्या कण्या अर्धी वाटी
लसूण पाकळया 5-6
लाल मिरच्या 3-4
फोडणीकरीता – तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद, मीठ व गूळ

कृती –

अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत, व्यवस्थित धुवुन बारीक चिरावीत. एका भांड्यात एक वाटी तांदुळाच्या कण्या घेवून त्या धुवून त्यात अडीच ते तीन वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी व भांडं कुकरला लावावं. तांदुळाच्या कण्याबरोबरच अंबाडी शिजते व एकजीव होते. कुकर झाल्यावर तांदळाच्या कण्या व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात. कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेले कण्या व अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक वाफ द्यावी.

मेथीची पीठ पेरुन केलेली भाजी

साहित्य:-

मेथीची कोवळी पानं 1 जूडी

बेसन 2 मोठे चमचे
तिखट, मीठ चवीनुसार
फोडणीचे साहित्य हिंग, मोहरी, कढीपत्ता

कृती:-

सर्व प्रथम मेथीची पाने हाताने खुडून घ्या. एका कढईत फोडणी तयार करुन मेथीची पाने टाकून मंद आचेवर शिजवावी. वरुन डाळीचं पीठ पेरावं, कडेनं तेल साडून तिखट, मीठ घालून ढवळावं. मंद आचेवर दोन-तीन वाफा आणाव्या. न चिरता हातानं खुडलेल्या या भाजीला खास चव येते. मेथीचा कडवटपणा अजिबात राहत नाही.

मेथीची उसळ

साहित्य –

मेथी पाव वाटी
लसूण, हिंग, मोहरी फोडणीकरीता
चिरलेला कांदा अर्धी वाटी
मीठ, गूळ चवीनुसार
कोकम 2 चमचे
खोबरा कीस पाव वाटी

कृती –

पाव वाटी मेथी भिजत घालून तिला मोड आणावी. पातेल्यात हिंग, मोहरी, लसूण देऊन त्यात बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालावा व गुलाबी रंगावर परतून घ्यावे. नंतर त्यात मेथी घालून थोडा पाण्याचा शिपका मारवा व मेथी शिजू दयावी. शेवटी चवीनुसार मीठ, गूळ, कोकम व खोबÚयाचा किस घालून गॅस बंद करावा व गरमागरम सव्ह्र करावे.

सुरणाची भाजी

साहित्य:-

सुरण 1 किलो
लाल मिरची 4-5 नग
हिंग पाव चमचा
हळद अर्धा चमचा
मोहरी 1 चमचा
उडद डाळ 1 चमचा
चिंच 1 नग
तेल तळायला
मीठ चवीनुसार

कृती:-

सुरण सोलून त्याचे लहान चैकोनी तुकडे करुन घ्यावे. व नीट धुऊन घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, उडद डाळ व लाल मिरचीची फोडणी करावी. मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात सुरण, हळद, हिंग, मीठ व चिंचेचा कोळ घालून शिजवावे. झाकण लावून मंद आचेवर थोडया वेळ शिजू दयावे सुरण शिजल्यावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. भात व रस्सम बरोबर सव्र्ह करा.

 रव्याची खीर

साहित्य –

रवा 1 वाटी
दूध 1 लिटर
साखर पाऊण वाटी
पाणी 1 वाटी
वेलची पूड 1 चमचा
जायफळ पूड अर्धा चमचा
चारोळी 4 चमचे
तूप 4 चमचे
मीठ चिमूटभर

कृती –

सर्व प्रथम रवा तूपावर तांबूस रंगावर भाजून घ्या. नंतर यामध्ये 1 लिटर दूध व एक वाटी पाणी घालून चांगले घट्ट होईस्तोवर उकळून घ्या. नंतर यात साखर वेलची पावडर, जायफळ, चारोळी, चिमूटभर मीठ घालून चांगली उकळून खायला दया.

 हुलग्याच्या शेंगोळया

साहित्य –

बारीक दळलेले हुलगे 2 वाटया
वाटलेली मिरची 2 चमचे
लसूण 1 चमचा
जीरे 1 चमचा
मोहरी अर्धा चमचर
काळी मिरी अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तेल 4 चमचे

कृती –

दळलेल्या पिठात चमचाभर वाटण घाला. पाण्याने घट मळा. हातावर वळती येतील असे लांबट शेवेसारखे लहान लहान आकार करा. तेलात फोडणी तयार करुन पाणी घाला. त्यात ही हाताने वळलेली शेव घाला व शिज दया. ज्वारीच्या भाकरीबरोबर हे शेंगोळयाचे कालवण छान लागते.

 वरणफळे

साहित्य –

तूर डाळ 1 वाटी
कणीक 1 वाटी
मोहरी अर्धा चमचा
कढीपत्ता –
लाल मिरच्याचे तुकडे 1 चमचा
कोथिंबीर 4 चमचे
चिंच 1 इंच
गूळ चवीनुसार
किसलेले खोबरे पाव वाटी
मीठ चवीनुसार

कृती –

कणकेत मीठ घालून घट्टसर मळून घ्या. शिजलेल्या तुरीच्या डाळीला फोडणी देताना एकामागोमाग एक सर्व जिन्नस घाला. उकळी येईपर्यंत कणकेच्या पोळया पातळसर लाटून त्याचे शंकरपाळयासारखे काप करा. उकळी आली की ते वरणात सोडा व झाकण ठेवून शिज द्या.