पोळी/भाकरी/पराठे

फुलका पोळी –

1 किलो कणकीत साधारण 10 ग्रॅम मीठ व 50 ग्रॅम तेल घालून भिजवावे ज्यामुळे पोळया चवदार होतात. पोळया करण्यापूर्वी साधारण 15 ते 20 मिनिटे आगोदर पोळयांची कणीक भिजवून ठेवा. एक-एक गोळा लाटून शेकून घ्याव्यात.

घडीची पोळी

घडीचा पराठा

साहित्य –

कणीक 3 वाटया
मीठ चवीनुसार
तेल 3 चमचे

कृती –

3 वाटया कणीक, चवीनुसार मीठ, 3 चमचे तेल घालून मिश्रण व्यवस्थित कोमट पाण्याने भिजवून घ्या. नेहमीप्रमाणे गोल पोळी लाटून त्यावर तेल लावा घडी करा, अध्र्या भागात तेल लावून पुन्हा घडी करा व त्रिकोणीच लाटा तव्यावर थेकतांना कापडयाच्या बोळयाने दाबून दाबून शेका. शेकतांना तूप किंवा तेलाचा वापर करु नका.

 पुरी

साहित्य:-

कणीक 2 वाटया
तीळ 3 चमचे
धणे-जीरे पावडर 1 चमचा
आमचूर पावडर 1 चमचा
मीठ, हळद चवीनुसार
तिखट चवीनुसार
लसूण पेस्ट अर्धा चमचा

कृती:-

कणकेमध्ये तीळ, धणे-जीरे पावडर, आमचूर पावडर, मीठ, हळद, तिखट व अर्धा चमचा लसूण पेस्ट मिसळून गोळा तयार करा. त्याच्या पु-या लाटून तळून घ्या.

ज्वारीची भाकर

साहित्य:-

ज्वारीचे पीठ 2 वाटया
तांदूळाचे पीठ 2 चमचे
मीठ चवीनुसार
तीळ 1 चमचा

कृती:-

पाणी गरम करुन त्यामध्ये थोडे मीठ घाला. पाण्यात मावेल ऐवढे ज्वारीचे पीठ व थोडी तांदूळाची पीठी घाला. पीठ मळून भाक-या थापून घ्या. भाकरी थापल्यावर त्यावर थोडे तीळ घाला. मंद आचेवर भाक-या शिजवून घ्या.

बाजरीची भाकर

साहित्य:-

बाजरीचे पीठ 2 वाटया
तांदूळाचे पीठ 2 चमचे
मीठ चवीनुसार
तीळ 1 चमचा

कृती:-

पाणी गरम करुन त्यामध्ये थोडे मीठ घाला. पाण्यात मावेल ऐवढे बाजरीचे पीठ व थोडी तांदूळाची पीठी घाला. पीठ मळून भाक-या थापून घ्या. भाकरी थापल्यावर त्यावर थोडे तीळ घाला. मंद आचेवर भाक-या शिजवून घ्या.

कळणाची भाकर

साहित्य:-

ज्वारी 1 वाटी
उडीद 1 वाटी
खडे मीठ चवीनुसार
आलं-लसूण 1-1 चमचा
तिखट चवीनुसार
गरम मसाला अर्धा चमचा

कृती:-

1 वाटी ज्वारी, 1 वाटी उडीद व खडे मीठ एकत्र करुन दळून घ्यावे. नंतर त्यात आलं, लसूण, चवीनुसार तिखट व थोडा गरम मसाला घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे. नेहमीच्या भाकरीप्रमाणे त्याच्या भाकरी बनवून खायला दयावे.