भैयाजी काणे यांचा सहवास मला लाभल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पूर्वेकडील अशांत परिसरातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी भैयाजींनी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली. यातून अनेक विद्यार्थी घडले. मणिपूर भागात काम करत असताना या भागातील विद्यार्थ्यांना ते मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांत घेऊन येत असत. भैयाजींना आपले मित्र व सहचिंतक उभे करण्याची सवय असल्याने, त्यांनी त्यांच्या साहाय्याने या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली. तसेच त्या मुलांना शिकता यावे म्हणून त्यांनी शाळा-महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना आपले मित्र बनवून घेतले व त्यातून त्यांनी त्या मुलांना शाळा-महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला. अनेकांना तांत्रिक शिक्षण दिले. यानंतर ती मुले परत आपापल्या गावी गेली, कारण भैयाजींनी तशी व्यवस्थाच केली होती. या मुलांनी मणिपूरमध्ये आपापला व्यवसाय करावा हेच त्यांना अभिप्रेत होते. या विद्यार्थ्यांपैकी दोन-तीन विद्यार्थी ‘रॉ’मध्ये काम करत आहेत. आजही हे विद्याथ्र्यी भैयाजींचे नाव काढतात

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    सुरेंद्र टण्णापूर्व सीमा विकास प्रतिष्ठानदादर

  • दूरध्वनी

    ९९६९५६९३०१

  • ई-मेल

    darshanajdave@gmail.com