रुद्राक्षांचे मुख्य प्रकार, त्यांची देवता आणि गुणधर्म

१)एक मुखी रुद्राक्ष-  हा रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ समजला जातो. महान योगीच हा धारण करतात. यामुळे षड्रीपुंवर विजय मिळवता येतो. सर्व मनोकामनापूर्ती होते. याची देवता परमात्मा शिव आहे. व धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो.
२)दोन मुखी रुद्राक्ष- हा  रुद्राक्ष अर्धनारी नटेश्वरचे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो..पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य, दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगतीसाठी हा धारण करतात.
३)तीन मुखी/त्रिमुखी रुद्राक्ष- हा अग्निदेवतेचे प्रतिक आहे. हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय मिळवता येतो. बुद्धी कुशाग्र होते.
४)चार मुखी रुद्राक्ष-
हा ब्रम्हदेवचे प्रतीक आहे. याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो.. अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. स्मरणशक्ती तीव्र होते.
५)पंच मुखी रुद्राक्-
हा  रुद्राक्ष पंचानन शिवाचे प्रतीक आहे. पंच महाभूतंचा यात समावेश होतो. धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन्य रुद्राक्षाकडेच आकर्षित होतात.
६)सहा मुखी/ षण्मुखी रुद्राक्ष-:हा रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही.
७)सात मुखी रुद्राक्ष-
 हा रुद्राक्ष सप्त मातृका, व  अनंत नागाचे प्रतीक आहे. माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दिर्घायुष्य व अपघातापासून रक्षण करतो. याच्या धारणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्पदंशा पासून रक्षण होते.
८)अष्ट मुखी रुद्राक्ष-
हा गणेशाचे प्रतीक आहे. याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात. याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समयसूचकता अंगी बाळगते. अनेक कलामध्ये नैपुण्य येते.
९)नऊ मुखी रुद्राक्ष-
हा भैरवाचे प्रतीक आहे. दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद याला प्राप्त आहे. हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही.
१०)दहा मुखी रुद्राक्ष- यमराज चे प्रतीक. अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात.
११)अकरा मुखी रुद्राक्ष-
११ रुद्रांचे प्रतीक. याला इंद्राचे प्रतिकही मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो.
१२)बारा मुखी रुद्राक्ष-
महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक. हा धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते.
१३)तेरा मुखी रुद्राक्ष-
 कामदेव स्वरूप. याला इंद्राचा आशीर्वाद लाभला आहे. हा श्राध्याच्या वेळी धारण केला तर पितरांना सद्गती प्राप्त होते.
१४)चौदा मुखी रुद्राक्ष-
हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात.
१५)गौरी शंकर रुद्राक्ष-
हे दोन रुद्राक्ष नैसर्गिक रित्या एकमेकांना चिकटलेले असतात, धारण कर्त्याला शिव-शिवाच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते. हा धारण न करता देवघरात ठेवतात.
१६)त्रिभुजी रुद्राक्ष-
हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते. हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही.

धारण विधान-

पक्ष-
शुक्ल पक्ष-
वार-
रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
तिथीं-
द्वितीयेला, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा या तिथींना.
नक्षत्र-
हस्त, रोहिणी, स्वाती, उत्तरा, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा इत्यादी नक्षत्रावर.
लग्न-
मेष, कर्क, तूळ, मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

राशी नुसार रुद्राक्ष-

मेष- त्रिमुखी,
 वृषभ-षण्मुखी,
 मिथुन-:चारमुखी
कर्क- दोनमुखी,
 सिंह- एकमुखी,
 बारामुखी,
 कन्या-चारमुखी
 तुला- षण्मुखी,
 वृश्चिक-:त्रिमुखी
 धनु-: पंचमुखी,
 मकर- सातमुखी,
 कुंभ- सातमुखी,
 मीन- पाचमुखी
 सर्व साधारणपणे राशीनुसार रुद्राक्ष असे धारण करतात.

साभार