सांकशी

या पठारावरुन किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते.

* समोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीरे चलना अशी क्षणक्षणाला आठवण करून देणारी असल्याने कातळातील खोबण्या जरा जपूनच चढाव्या लागतात. उजवीकडे सुंदर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.
टेकडीच्या पलिकडच्या बाजूला खालच्या पठारावरून येणारी दुसरी वाट दिसते. या वाटेवर अनेक टाकी खोदली आहेत.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

दर्गा
तासा दीडतासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्याचा पायथा आला हे ओळखण्याची खूण म्हणजे बदुद्दीन दर्गा. हा दर्गा म्हणजे जवळपासच्या बारा गावांचं दैवत. हा दर्गा बराच जुना आहे. अलीकडेच या र्दग्याची नवी इमारत बांधली आहे. या र्दग्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जायला ठळकशी वाट आहे. किल्ल्याची चढण बरीच सोपी आहे. त्यामुळे मधल्या पठारावर जायला २० मिनिटं पुरतात. पठार संपूर्ण हिरवंगच्च असल्याने तिथं थांबण्याचा मोह टाळता येत नाही. पण वेळेचं गणित जुळवायला किल्ला लगेच चढायला लागणं उत्तम होते.

पाण्याची टाकी

यापैकी एका टाक्यातलं पाणी चक्क पिवळं आहे. थोडं अंतर चढून गेल्यावर कातळात खोदलेली टाकी लागतात. या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.

वैशिष्ट्य

समोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.