दानं प्रसाद:

“येन केन विधि दीन्हे दान करइ कल्याण!” कोणत्याही प्रकारचे दान हे कल्याणकारी असतं.(रामचरित मानस /103). ऋग्वेदामध्ये दानस्तुतीपर सुक्ते आली आहेत. ‘शरयतेजं कृती: दाक्ष: दानं ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म’, दानेन हरते व्याधिम्, बौद्ध उपासकही ‘दानं प्रसाद:’ हे बुद्धवचन मानतात.  दानाच्या या संकल्पनेमागे सोशल कमिटमेंट आहे.

परदेशस्थ आपल्या बांधवांना, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणाऱ्या संस्थांशी जोडणारा दुवामराठी ग्लोबल व्हिलेज ठरावा हा आमचा एक भाबडा प्रयत्न. काही सामाजिक संस्थांचा इथे समावेश करतोय. ह्या अवीरत पणे काम करणा-या संस्थांना आपण आपापल्या पध्दतीने फुल ना फुलाची पाकळी मदत पाठवू शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क ठिकाण आणि क्रमांक देत आहोत. आपण त्यांच्याशी थेट सवाद साधू शकता..आपली मदत पोहचवू शकता. चला तर दानक्रांती घडवू या…कारण

दानधर्म , जाणिजें ,

यज्ञकर्म, पुण्यकर्म