सोंगी मुखवटे

सोंगी मुखवटे हे नृत्य महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला देवीच्या पूजेप्रसंगी केले जाते. होळीदरम्यान हा उत्सव साजरा होतो. हातात छोटी काठी घेऊन हे नृत्य केले जाते. दोन कलाकार मिळून नरसिंहाच्या अवतारात नृत्य करतात आणि नर्तक काळ-भैरव, वेताळाचे मुखवटे घालून नृत्य करतात. असत्यावर सत्याचा विजय होता, असा संदेश या नृत्यातून दिला जातो. ढोल, पावरी, संबळ आदी वाद्य त्यात वाजवली जातात. सोंगी मुखवटे नृत्य ही एक पारंपरिक कला असली, तरी त्यामध्ये कोणत्याही काळातील वास्तवाशी जुळवून घेण्याचा जिवंतपणा आहे. विविध परिस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी सोंगी मुखवटय़ांच्या नृत्याविष्काराएवढा योग्य कलाप्रकार शोधूनही सापडणार

नाही.

देशाच्या राजधानीत गणराज्य दिनी राजपथावर सादर करण्यात आलेल्या ‘सोंगी मुखवटे’ या चित्ररथाला प्रथम क्रमांक देखील मिळालाय.