गिर्यारोहण

पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात दहा — पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.
डोंगरयात्रा हा एक स्वायत्त असा क्रीडाप्रकार आहे. त्याचबरोबर तो गिर्यारोहण क्रीडा प्रकाराचा पाया आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत गरजेपुरती सामग्री बाळगत डोंगराळ प्रदेशातून केलेली यात्रा अशी डोंगरयात्रेची सोपी व्याख्या .निसर्गावर विजय मिळविण्याची आणि जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा असते. त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती आहेत. गिर्यारोहणात घडणारे निसर्गाचे उदात्त दर्शन आणि व्यावहारिक जीवनातून होणारी
सुटका यांमुळेही लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटते. जितके शिखर उंच व चढण्यास कठीण, तितके मानवाचे प्रयत्न अधिक व उत्साहही दांडगा दिसून येतो. माणसाच्या विजिगीषू महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. गिर्यारोहणाच्या खेळात स्वतःच्याच सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून राहावे लागते.

गिर्यारोहणाचे दोन प्रकार आहेत :

(१) खडकारोहण (रॉक क्लाइंबिंग)

(२) हिमारोहण (आइस क्लाइंबिंग).

उभ्या चढणीचे टप्पे किंवा कडे, सुळके, एक हात किंवा पाय यांनाच आधार घेता येईल अशा लहान भेगा संपूर्ण शरीर सामावून घेणाऱ्या खडकातील विदरे (चिमनीज), आरोहकाचे हातपाय एकाच वेळी दोन्ही डगरींना स्पर्श करू न शकणाऱ्या घळ्या यांसारख्या कठीण गोष्टींवर चढून जाणे खडकारोहणात येते. खडकारोहण करताना साधारणतः एका तीस—चाळीस मीटर लांबीच्या दोरखंडाला पथकातील लोकांनी विशिष्ट अंतर सोडून बांधण्यात येते. पर्वतविवरांच्या आरोहणाकरिता पाठ-चवडातंत्राचा अवलंब करतात. या पद्धतीत आरोहक आपली पाठ खडकाला टेकवून हातांच्या व चवड्याच्या रेट्याने स्वतःस वर ढकलत नेतो. शिखरावरून खाली उतरताना गोफण दोरीत अडकविलेल्या दोरखंडाचा उपयोग करण्यात येतो..कातळारोहण म्हणजेच रॉक क्लाईंबिंग. कातळातील निसर्गत:च उपलब्ध असलेल्या खाचखळग्यात, कपरीत कातळकडय़ांवर चढाई करणे म्हणजेच कातळारोहण. यामध्येच जर पिटॉन, बोल्ट, एट्रिअर अशा साधनांचा वापर केला तर त्यालाच कृत्रिम प्रस्तरारोहण म्हटले जाते. योग्य मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य व सराव याशिवाय कातळारोहणामध्ये नैपुण्य मिळवणे अशक्य आहे.

डोंगरयात्रा ट्रेकिंग व कातळारोहण क्षेत्राशी पुरेशी तयारी झाल्यावर आपण हिमपर्वतयात्रा म्हणजेच हाय अल्टीटय़ूड ट्रेकिंग प्रकाराकडे वळू शकतो. सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून तीन ते चार हजार मीटर उंच पर्वतरांगांवर हा क्रीडाप्रकार अनुभवता येऊ शकतो. हा प्रकार साधारण १५ दिवस ते महिनाभर चालू शकतो. या पुढचा टप्पा म्हणजेच हिम-बर्फारोहण. यासाठी मात्र अतिशय तांत्रिक अशा सरावाची, अभ्यासाची, प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. हिमाच्छादित शिखरांवर अंगभूत कौशल्याच्या साथीने केलेला हा उपक्रम तसा वेगळाच होता. आजकाल गिर्यारोहणात विविध प्रकार विकसित झाले आहेत की गिर्यारोहणाची नेमकी व्याख्या काय? असा प्रश्नच बऱ्याच वेळा पडतो. ढोबळमानाने पाहिले तर हाइकिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाईंबिंग, स्नो अ‍ॅण्ड आइस क्लाईंबिंग असे टप्पे आढळतात.साधारणपणे १००० मीटपर्यंत जमिनीच्या वरील उठावास डोंगर म्हटले जाते. यापुढे पर्वत ही संकल्पना आहे. अशा डोंगरावरील एक दोन दिवसां

च्या भटकंती, चढाईला हाइकिंग असे संबोधले जाते. ज्याला आपण पदभ्रमण असे म्हणू शकतो. पण केवळ पदभ्रमण म्हणजे डोंगरयात्रा नव्हे किंवा ट्रेकिंग म्हणजेच गिरीभ्रमण नव्हे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणाव्या लागतात. कारण हिम भुसभुशीत असते, तर बर्फ कठीण असते. हिम-आंधळेपणा टाळण्याकरिता आरोहकांनी कोठल्याही परिस्थितीत गडद रंगाचा चष्मा घालणे आवश्यक असते.  हिमदरीचा शोध घेण्याकरिता व त्यावरचा हिमपूल किती भरीव आहे याची चाचणी करण्याकरिता हिमकुऱ्हाडीचा उपयोग गिर्यारोहक करतात. घसरंडवजा बर्फाच्या चढणीवर किंवा कठीण बर्फावर कुशल गिर्यारोहक या हिमकुऱ्हाडीचा उपयोग चढण्यास योग्य पायऱ्या खोदण्याकरिता करतो. असे करताना त्याला स्वतःचा तोल सांभाळता यावयास पाहिजे. कठीण हिमावर वा बर्फावर लोखंडी पत्र्याचा तळवा असलेल्या बुटाचा उपयोग चांगला होऊ शकतो. प्रसंगी हिमखुंट्यांचा किंवा हिमस्क्रूंचाही उपयोग करण्यात येतो.

खडकारोहणापेक्षा हिमारोहणास अधिक कुशलता व अनुभव लागतो. परिस्थितीचा नीट अंदाज बांधून निर्णय घेण्याच्या नेत्याच्या क्षमतेवर हिमारोहण पथकाची यशस्विता व सुरक्षितता अवलंबून असते.