शिंगाड्याचा हलवा

साहित्य:-

शिंगाड्याचे पीठ 2 वाटया
साखर पाऊण वाटी
दुध 1 वाटी
साजूक तूप 4 चमचे
विलायची पावडर पाव चमचा

कृती:-

शिंगाड्याचे पीठ तुपामध्ये खरपूस भाजून घ्यावे. यामध्ये दुध वेगळे तापून घालावे. त्यानंतर यात साखर, वेलची पावडर, इत्यादी घालून एक वाफ येऊ द्यावी. वरतून बदामाचे काप घालेन सव्र्ह करावे.

 साबुदाणा वडा

साहित्य:-

साबुदाणा 2 वाटया
उकडलेला बटाटा 1 नग
दाण्याचा कुट अर्धी वाटी
दही पाव वाटी
जीरे 1 चमचा
मीठ चवीनुसार
हिरवी मिरची 5-6
कोथिंबीर –

कृती:-

2 वाटया भिजवलेला साबुदाणा घेवून त्यामधे एक कुस्करलेला बटाटा, दाण्याचे कुट, दही, जिरे, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून त्याचे हलक्या हाताने गोळे करुन डीप फ्राय करा.

उपवासाचा उपमा

साहित्य:-

वरीचे तांदूळ 1 वाटी
तूप 4 चमचे
जीरे 1 चमचा
शेंगदाणे अर्धी वाटी
हिरवी मिरची 5-6
मीठ, साखर चवीनुसार
लिंबाचा रस 1 चमचा
ओलं खोबरं 4 चमचे
कोथिंबीर –

कृती:-

एका पातेल्यात तूप घालून त्यात जिरे, शेंगदाणे व हिरवी मिरची फोडणीला घाला नंतर यात व-याचे तांदूळ घालून खरपूर भाजा. नंतर चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालून त्यावर कडकडीत गरम पाणी घाला व छान वाफ येवू दया. कोथिंबीर ओलं खोबरं घालून खायला दया.

उपवासाचे कटलेट

साहित्य:-

उकडलेले बटाटे 2 नग
हिरवी मिरची 5-6
कोथिंबीर पाव वाटी
साबुदाणा पीठ 1 वाटी
राजगीरा पीठ 1 वाटी
बटाटयाची तयार शेव 1 वाटी

कृती:-

एका पातेल्यात 2 चमचे तेल घेऊन त्यात मिरची, कोथिंबीर चटणी घाला. थोडे परतून उरलेले जिन्नस घालून हा मसाला बटाटयात मिक्स करा मिश्रण थोडं ओलं झालं असेल तर भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ किंवा राजगीरा पीठ घाला. नंतर याचे चप्पट गोळे थापून ते बटाटाच्या शेवेत घोळवून डीप फ्राय करा. दही मिरची बरोबर खायला द्या.

 बटाटा थालीपीठ

साहित्य:-

बटाटे 2 नग
हिरवी मिरची 5-6
जीरे 1 चमचा
भाजलेल्या दाण्याचे कुट अर्धी वाटी
साबुदाणा 1 वाटी
मीठ, साखर चवीनुसार
लिंबू 1 नग
दही 1 वाटी

कृती:-

कच्चा बटाटा सोलून मिक्सरमध्ये बारीक करा, त्यामध्ये हिरवी मिरची, जीरं, भाजलेल्या दाण्याचे कुट, भिजवलेला साबुदाणा, चवीनुसार मीठ, साखर व थोडे लिंबू पिळा. मिश्रण एकत्र करुन कोथिंबीर घाला. नंतर हे मिश्रण तव्यावर जाडसर पसरवा. थोडे तेल घालून छान खरपूस परतून घ्या. दह्याच्या चटणीबरोबर खायला दया. दह्याच्या चटणीकरीता एक वाटी दही घोटून घ्या. 3-4 हिरव्या मिरच्या भाजून ठेचून घ्या. चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर घालून एकत्र करा वर जि-याची फोडणी घाला.

 मकई चाट

साहित्य:-

स्विटकाॅर्न 2 वाटया
अनारदाणे अर्धी वाटी
लिंबाचा रस 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर पाव वाटी
जीरे पावडर 1 चमचा
ओलं नारळ 2 चमचे
काॅर्नफ्लेक्स पाव वाटी

कृती:-

2 वाटया स्विटकाॅर्नचे दाणे वाफवून घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी अनारदाणा, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जीरे पावडर व 2 चमचे ओला नारळ घालून मिश्रण एकत्र करा. त्यावर काॅर्नफ्लेक्स घालून लगेच सर्व्ह करा.

राजगी-याचा शिरा

साहित्य:-

राजगी-याचे पीठ 2 वाटया
साजूक तूप पाव वाटी
दूध 2 वाटया
साखर 1 वाटी
बदाम, पिस्ता अर्धी वाटी
वेलची पावडर 2 चमचे

कृती:-

2 वाटया राजगीरा पीठ पाव वाटी साजूक तूपात छान भाजून घ्या. खमंग वास सुटल्यावर त्यामध्ये अंदाजे एक ते दीड वाटी गरम दूध घाला. नंतर पाऊण वाटी साखर घालून बदाम, पिस्त्याचे काप, वलेची पावडर घालून सव्र्ह करा.

चीज काॅर्न पॅटीस

साहित्य:-

चीज अर्धी वाटी
मक्याचे दाणे 2 वाटया
उकडलेला बटाटा 1 नग
काळी मिरी 1 चमचा
हिरवी मिरची 5-6
कोथिंबीर –
दही 1 वाटी

कृती:-

अर्धी वाटी चीज किसून घ्या. 2 वाटी मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करुन त्यामध्ये 1 बटाटा मिसळा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी किंवा हिरवी मिरची, कोथिंबीर मिसळून त्याचा एक गोल गोळा तयार करा. त्यामध्ये किसलेला चीज भरुन गोळा बंद करा. मंद आचेवर तव्यावर शेलो फ्राय करुन दही बरोबर खायला दया.

 रताळयाचे न तळलेले कटलेट

साहित्य:-

रताळे पाव किलो
दाण्याचा कुट अर्धी वाटी
नायलाॅन साबुदाणा अर्धी वाटी
(मायक्रोव्हेव मध्ये भाजलेले)
कोथिंबीर 4 चमचे
हिरवी मिरची 2-3 नग
मीठ, लिंबू, साखर चवीनुसार
जिरे पावडर अर्धा चमचा

कृती:-

रताळे उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर, हिरवी मिरची, घालून छान मिसळावे. व त्याचे गोल कटलेट तया करा. नंतर बारी नायलाॅन साबुदाणा घेऊ तो मायक्रोव्हेव वर फोडा व तयार केलेले कटलेट त्यामध्ये घोळवून पुन्हा अर्धा मिनिटे मायक्रोव्हेवमधे ठेवा. चटणी बरोबर सव्र्ह करा.

पनीर खिचडी

साहित्य:-

बारीक कापलेले पनीर 1 वाटी
दाण्याचे कुट अर्धी वाटी
हिरवी मिरची 3-4
कोथिंबीर 2 चमचे
मिठ, लिंबू, साखर चवीनुसार
तेल 2 चमचे

कृती:-

फ्रायपॅन मध्ये तेल गरम करुन प्रथम जीरं, हिरवी मिरची, त्यानंतर पनीर टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात दाण्याचा कुट व उरलेले साहित्य टाकून परतून थोडी वाफ आणून खायला द्यावे.
टीप:-

हा खिचडी प्रकार शोधण्या मागचं कारण हे की, खिचडी करायचं म्हटलं की साबुदाणा 2-3 तास आगादेर भिजवावा लागतं व तो कधी-कधी चिकट होतो त्यामुळे खिचडी चांगली लागत नाही. याचबरोबर साबुदाण्यापेक्षा पनीर मध्ये कितीतरी पौष्टिक तत्वे आहेत. त्यामुळे खिचडीचा नविन प्रकार मला फारच आवडला. तुम्ही करुन बघा.

 शिंगाडयाची भाजी

साहित्य:-

शिंगाडे 15 ते 20 नग (बाजारालीत काळे उकडलेले शिंगाडे)
आलं 1 इंच तुकडा
लसूण 10 ते 15 कळ्या
हिरवी मिरची चवीनुसार
कोथिंबीर अर्धी वाटी
ओले खाबरे अर्धी वाटी
हळद पाव चमचा
जीरे अर्धा चमचा
तेल 2 चमचे
मीठ चवीनुसार

कृती:-

आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरे वाटून घेणे. पॅन मध्ये 4 चमचे तेल घेऊन त्यात जिरे तडतडल्यावर हे वाटण घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर थोडी हळद व शिंगाडे सोलून घालावे. अंगच्याच पाण्याने थोडे शिजवून भाताबरोबर किंवा गरम पोळीबरोबर वाढावे व लिंबाची फोड द्यावी.

शिंगाडयाचे सुकी भाजी

साहित्य:-

टरफल काढलेले शिंगाडे 2 वाटया
बा. चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा
कोथिंबीर –
मीठ चवीनुसार
लिंबाचा रस चवीनुसार
हळद पाव चमचा
हिंग चिमुटभर
तेल –

कृती:-

फ्राय पॅनमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जिर घालावे. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून परतावे. त्यानंतर त्यात हळद व हिंग घालून शिजवलेले शिंगाडे टाकावे. चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालून सव्र्ह करावे.
टीप:- उपवासाची भाजी करायची असल्यास हिंग व हळदीचा वापर टाळावा व 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट घालावे.