तळागाळातील महिला व त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पुण्यातील ‘वंचित विकास’ ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. गरजू महिलांचे सबलीकरण आणि पुनर्विकास यांचे शिवधनुष्य या संस्थेने लीलया पेलले आहे. यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबविते. देहविक्रय करणाऱ्या अनेक महिलांचे आयुष्य वंचित विकास या संस्थेने वाचवले आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय, आदिवासी, शेतमजूर, परित्यक्ता व विधवा अशा तळागाळातील महिला व त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य वंचित विकास संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. १९८५मध्ये विलास चाफेकर यांनी या संस्थेची स्थापना केली. गरजू महिलांचे सबलीकरण व पुनर्विकासाचे धनुष्य या संस्थेने लीलया पेलले आहे. यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबविते.

नीहार :

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी पाच जुलै १९८९ रोजी नीहार या घरकुलाची पायभरणी करण्यात आली. या ठिकाणी राहणाऱ्या तब्बल ९४ मुलामुलींचे पुनर्वसन झाले आहे. तसेच ६० मुलींचे विवाहदेखील झाले आहेत.

फुलवा :

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने ‘फुलवा’ हा उपक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत एकाच छताखाली तीन महिन्यांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पाळणाघर, बालवाडी, अभ्यासवर्ग, अनौपचारिक शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, संगणक शिक्षण यांसारखे उपक्रम २००५पासून राबविले जात आहेत.

सबला महिला केंद्र :

महिलांच्या सबलीकरणासाठी १९८२पासून संस्थेमार्फत सबला महिला केंद्र चालवले जात आहे. कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी कुटुंबांना समुपदेशन करणे, संसार मोडू नये म्हणून प्रयत्न करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. पुण्यासह लातूरमध्येदेखील अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    वंचित विकास, ४०५/९, नारायण पेठ, पुणे – ३०

  • दूरध्वनी

    (०२०) २४४५४६५८, २४४८३०५०

  • ई-मेल

    vanchitvikas85@gmail.com