वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय ?

वस्तूची नेमकी जागा, तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते.शास्त्र वैज्ञानिक सत्य आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकवीसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय?

कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तुच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे. देशातील अनेक मंदिरे, प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. वास्तूंमधील गुणदोषामुळे अनेक चमत्कारिक बाबी घडत असतात, त्याची कारणेही आपण देऊ शकत नाही. एखाद्या मोडकळीस आलेल्या घरात रहाणारा माणूस कोट्यधीश बनतो आणि कोट्यधीश माणसाचे दिवाळे निघते, असे नेमके का होते, हे आपल्याला कळत नाही. याचे कारण वास्तुशास्त्र आहे.

  शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही. स्पष्ट शब्दात दिलेली उत्तरे आहेत. वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच.

आपण नेहमी पाहतो, काही घरातील कर्ता पुरूष किंवा स्त्रीचा अचानक मृत्यू होतो. काहींच्या घरात नेहमी आजारणपणे चालत असतात. काहींची वंशवेल खुरटलेली असते. काही घरांत नेहमी पती-पत्नीत भांडणे होतात. काहींची मुले दिवटी निघतात. हे सगळे कशामुळे? याचे कारण वास्तुदोष आहे.

तुम्हाला माहितीये? ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील पुरूष साठ वर्षांहून अधिक काळ जगत नाही. हा त्यांच्यातील शरीर दोष नाही. ग्वाल्हेरच्या राजवाड्यात असा कोणता तरी दोष असेल, ज्यामुळे पुरूषाचा मृत्यू लवकर होतो.

  वेद, पुराणातील काही संदर्भ…

 इसवी सन 1480 मध्ये उदयपूरचे राजे कुंभकर्ण यांच्या काळात श्रीमंडन याने वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिला होता. त्यावर 1891 मध्ये राजवल्लभ नावाचे एक ग्रंथही प्रकाशित झाले होते. हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक मानले जाते.

 पृथ्वीवरील चुंबकीय प्रवाह, दिशा, सूर्याची किरणे, वाऱ्याची दिशा, गुरूत्वाकर्षण या साऱ्यांचा वास्तुशास्त्रात विचार केल्याचे या ग्रंथात म्हटले आहे.

राजवल्लभशिवाय मयशिल्पम , शिल्प रत्नाकर , समरांगण सूत्रधार हे दुर्मिळ ग्रंथही वास्तुशास्त्रासंदर्भात महत्त्वाची माहिती देतात.

अथर्ववेद , यजुर्वेद , भविष्य पुराण , मत्स्यपुराण , वायूपुराण , पद्मपुराण , विष्णू धर्मोत्तर पुराण , गर्ग संहिता , नारद संहिता , सारंगधर संहिता , वृहत संहिता यातही वास्तुशास्त्राविषयी बरीच माहिती मिळते.

वास्तूशात्रा नुसार देवघर /पुजाघराची माहिती

प्राचीन मंदिरातील कोणत्याही मुर्ती, भग्न, अवशेष,अथवा कलाकृत्या पुजाघरात नसव्यात.

पुजाघरातील कोणत्याही भिंतीस कोरून अथवा जोङुन देव ठेवु नये. भिंतीपासुन किमान एक इच जागा सोडून देव ठेवावे.

पुजाघरातील भिंती बाहेर निघालेल्या पङघ्या पश्चिम व दक्षीण दिशेस असाव्यात.

 पुजाघरात कोणत्याही अनावश्यक अथवा आवश्यक जङ वस्तु, ङब्बे,कपङे इ.ठेवु नये .

पुजाघरास कर्टनने विभागुन इतर कोणत्याही गोष्टी करीता या खोलीचा वापर करु नये.

 पुजाघरास एक शटरचा, पत्राचा अथवा लाकङी ग्रिलचा दरवाजा नसावा.

पुजाघरास केवळ दोन शटरचा लाकडी दरवाजा असावा. बाभुळ किंवा अङजात लाकङा पासुन दरवाजा बनवलेला नसावा.

पुजाघराचा दरवाजा आपोआप बंद किंवा उघङणारा नसावा.या दरवाजयास स्प्रिग किंवा ङोअर क्लोजर लावू नये.

पुजाघरात कोणतेही धन किंवा पैसै लपवून / ठेवु नये.

 पुजाघराच्या छतास कोणत्याही भागात झरोका अथवा व्हेटिलेशन ठेवू नये. पुजाघरातील देवाच्या नजरा एकमेकां समोर नसाव्यात.

वास्तूशास्त्रा नुसार  दुकानाची  माहिती

 उत्तरेस व पुर्वेस रस्ते आणि प्रवेशद्वारे असलेली दुकाने भरभराटीस येतात.

नैॠत्य व वायव्य दिशेस प्रवेशद्वारे अथवा रस्ता असलेली दुकाने १० ते २० वर्षे खुप जोरात चालतात व कालांतराने हळूहळू कमी होतात. (१०० पैकी ७० दुकानात हे आढळते , ३०%यास अपवाद आहेत कारण वास्तुचे इतर शुभ घटक त्याना मदत करीत असतात).

दुकानाच्या दक्षीण, पच्छीम भागात मालाच्या रॅक्स किंवा शोकेसेस असाव्यात.

 काउंटर दक्षीणेच्या आग्नेय, नैॠत्य किंवा पच्छिमेस अथवा वायव्य दिशेस असावे.परंतु काउंटर कधिही ऊत्तरेस अथवा ईशान्य कोपर्यात नसावे.

दुकानातील फर्नीचर जास्तीत जास्त लाकङी असावे.

 ग्राहकाने बसल्यानंतर पच्छिम किंवा दक्षीण बाजू बघावी व मालकाने पुर्व किंवा उत्तरेकङे तोङ करुन बसावे.

 ईशान्य कोपर्यात पाण्याचा माठ असावा.

 आग्णेय कोपर्यात मुख्य मिटर,स्विच बोर्ङ असावा.

दुकानास उंबरठा असणे अत्यावश्यक आहे.

 दुकानातील कॅश काउंटर दक्षीण भिंतीस असावे व उत्तरेस उघडावे अथवा पच्छिमेकङे असावे व पुर्वेस उघङावे.

 लवकर खपवण्याचा माल उतरेकङील वायव्य कोपर्यात ठेवावा. हमखास फायदा होतो.

 दुकानातील काउंटर काटकोनात असावे. कोठेही तिरपा राऊङ कट नसावा.

 पुस्तकालय,कागद अथवा विध्ये सबधिची दुकाने पुर्वेस चांगली चालतात.

 व्यावसायिक दुकाने ऊतरेस चांगली चालतात.

 सराफी, सोन्या चांदीची, लेङीज शाँपीग ,ङैस मटेरीयल अर्थात स्री प्रधान व्यवसाय दक्षीणेच्या आग्णेय कोपर्यात किंवा दक्षीणेसच चांगली चालतात. यांचे मुख्य प्रवेशद्वार नैॠत्य कोपर्यात नसावे.

 हाॅटेल्स,खानावळी,मिठाई, इलेक्ट्रॉनिकची दुकाने इ.पुर्वेच्या आग्णेय कोपर्यात भरपुर चालु शकतात.