वेद

जे जगात नाही ते वेदात आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.’मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्’ अशी वेदाची व्याख्या करता येईल.जगातील पहिले साहित्य वेद.वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. आपल्या हिंदूधर्मामध्ये चार वेद आहेत.ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असे म्हटले जाते.

वेद हा संस्कृत शब्द असून तो ‘विद्’ या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद ‘दिसले’ म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे.सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला “ब्रह्म” असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. वेदोऽखिलो धर्ममूलम् | असे मनुवचन प्रसिद्धच आहे.वेदांमध्ये तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते.व्यक्ती,समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद,स्मृती,सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत.भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.

ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते.काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा.लोकमान्य टिळकांनी ‘ओरायन’हा ग्रन्थ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे. डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो

वेदांमध्ये अग्नी,इंद्र,वरूण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत.वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत.वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था,लोकजीवन,संस्कृती,आश्रम व्यवस्था , शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते

ख-या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदाचा उच्चार योग्य माणसाने,योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो.गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान सांभाळले गेले पाहिजे.

ऋग्वेद

मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात देवता अंतरीक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे.

१) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो.

२) सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे. तो उत्पादक म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात म्हटले आहे की, देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे. हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे म्हटले आहे.

३) पापी, दुष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक, यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात.

४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे.

५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा काहीसा अर्थ काही ठिकाणी आहे.

ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुल्लर विल्सन मॅकडोनाल्ड यांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतांत वेंकटेश्वर दास व वृंदावन भट्टाचार्य हे वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित असावी, असे म्हणतात. वेदांमध्ये देवांच्या मानवी रूपाचे वर्णन आढळत असले तरी वेदांत त्यांच्या मूर्तिपूजा ध्वनित करणारी वचने मुळीच सापडत नाहीत. ऋग्वेदातील रचना आणि शब्द द्विअर्थी आहेत.

ऋग्वेद मंडलानुसार कवी

प्रथम मण्डल अनेक ऋषि

द्वितीय मण्डल   गृत्समद

तृतीय मण्डल    विश्वामित्र

चतुर्थ मण्डल वामदेव

पंचम मण्डल अत्रि

षष्ठम मण्डल    भारद्वाज

सप्तम मण्डल    वसिष्ठ

अष्ठम मण्डल    कण्व व अंगिरा

नवम मण्डल (पवमान मण्डल) अनेक ऋषी

दशम मण्डल अनेक ऋषि

यजुर्वेद

यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत – शुक्ल संहिता व कृष्ण संहिता.दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मणग्रंंथातील गद्य भाग दिले आहेत, तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत. [१] शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

शुक्ल यजुर्वेद

शुक्ल यजुर्वेदाच्या ‘वाजसनेयी संहिता’ म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत.

  • वाजसनेयी माध्यंदिन – मुळची बिहार येथील
  • वाजसनेयी कण्व- मुळची, कोशल येथील

वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, काण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध आहे..

जगदगुरु आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, काण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरुंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबिली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,काण्व शाखीय वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, ‘बृहदारण्यक’हेहा सर्व उपनिषदांत आकाराने सर्वात मोठे आहे. ईशोपनिषदालाच ईशावास्य उपनिषद असेही म्हटले जाते.

वाजसनेयी संहितेत,खालील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे –

अध्याय-

  • १ व २ : नवीन व पूर्ण चंद्र आहुती. याला दर्श व पूर्ण इष्टी असे म्हणतात.
  • ३ : अग्निहोत्र
  • ४ ते ८ : सोमयज्ञ
  • ९ व १० : वाजपेय व राजसूय – सोमयज्ञाचे दोन सुधार
  • ११ ते १८ : अग्निचयनासाठी विशेषेकरून वेदी व कुंड निर्माण.
  • १९ ते २१ :सौत्रामणी, अती सोमपानाने होणाऱ्या असरावर उतार म्हणून
  • २२ ते २५ :अश्वमेध
  • २६ ते २९ : वेगवेगळ्या धार्मिक प्रयोजनांसाठी पूरक मंत्र
  • ३० व ३१ : पुरुषमेध
  • ३२ ते ३४ : सर्वमेध
  • ३५ : पितृयज्ञ
  • ३६ ते ३९ : प्रवरयज्ञ
  • ४० : हा शेवटला अध्याय हे प्रसिद्ध ईशोपनिषद आहे.

‘वाजसेनीय संहिते’ चे संपादन व प्रकाशन ‘वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि इंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले.

कृष्ण यजुर्वेद

यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.

  • तैत्तिरीय संहिता – मुळची, पांचालची
  • मैत्रयणी संहिता – मुळचीकुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडील भागातली
  • चरक कथा संहिता – मुळची, मद्र व कुरुक्षेत्र प्रांतातली
  • कपिष्ठल कथा संहिता – बाहिका, दक्षिण पंजाबातील

प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रातिशाख्ये संलग्न होते.

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य ‘यज्ञ’ हे आहे.(१)

तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तिरीय संहिता आहे. हे नाव ‘ निरुक्तकार यास्काचार्य यांंचा शिष्य ‘तैत्तिरी’ वरून पडले. त्यात ७ अध्याय /कांडांचा समावेश आहे.त्याची पुढे ‘प्रपाठक’ व नंतर ‘अनुवाक्’म्हणुन विभागणी झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे. उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात ‘रुद्र चमक’ आहे आणि १.८.६.१ यात महामृृत्युंंजय मंत्र. भूः ,भुवः,स्वः हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंब सूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता(७ कांड), तैत्तिरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तिरीय (७ प्रश्न) तैत्तिरीय उपनिषद-(शिक्षावली, आनंदवल्ली भृगूवल्ली व महानारायण उपनिषद.

उच्चारणाचे वेगळेपण

इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार या बाबतीत शुक्ल यजुर्वेद फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक “य” च्या जागी “ज” आणि “श” च्या जागी “ख” उचारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीने उचारतात.अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक करतात आणि स्वर मानेने व्यक्त न करता हाताने करतात.[२]

याज्ञवल्क्य’ हा ‘वैशंपायन ऋषीं’कडून परंपरेनुसार ‘वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असे मानले जाते. तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता. त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे. वेदांच्या निरूपणात(interpretation ) दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी,’वैशंपायन ऋषी’ इतके संतापले की, त्यांनी त्यांंचे ज्ञान परत मागितले. याज्ञवल्क्य याने ते ओकून टाकले. ‘वैशंपायन ऋषी’ यांंच्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाऊन टाकले. म्हणून, यास ‘तैत्तिरीय संहिता’ असे म्हणतात. गुरूने दिलेले सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्याने सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी सूर्याने घोड्याचे रूप घेतले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. वैशंपायन मूळ संहितेला शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे.

सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचा ज्याला सामगान असे म्हणतात अशा सूचीत केलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायल्या जातात. सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.

सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे, हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणारणीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.

सामवेद

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे ‘गायन’ आणि वेद म्हणजे ‘ज्ञान’ होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते..

वेदा हि यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-

१. प्रस्ताव

२. उद्गीथ

३. प्रतिहार

४.उपद्रव

५. निधन

सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्राय: तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.भारतीय संस्कृती-इतिहासात चतुर्थ वेद म्हणून मान्यता पावलेला,परंतु परंपरागत ब्राह्मण वर्गाने वेद त्रयीमध्ये समावेश करण्यास नाकारलेला अथर्ववेद, यज्ञीय धर्मसाधनेच्या दृष्टीने ऋग्वेदाहून कमी महत्वाचा असला, तरी भारतीय लोकसाहित्याचा आद्य स्रोत या दृष्टीने सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तो ऋग्वेदाहूनही अधिक महत्त्वाचा आहे. सर्वंकष समाजाभिमुखता हे अथर्व वेदाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, समाजातील निष्कांचन ग्रामीण जनतेपासून उच्चपदस्थ राजा-महाराजांपर्यंतच्या समस्त वर्गांचा परामर्श या ग्रंथात आढळतो.

अथर्ववेदाची नावे

अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णु अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे. समाजातील सर्व थरांमध्ये, तसेच भारतातील सर्व धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो.अथर्ववेद हा अथर्वन आणि अंगिरस या दोन ऋषि समूहांनी रचला म्हणून यास अथर्वांगिरस असे एक प्राचीन नाव आहे. वैदिक गोपथ ब्राम्हणाच्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात हा भृगु आणि अंगिरस यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. याखेरीज परंपरेनुसार यातील काही रचनांचे श्रेय हे कौशिक, वसिष्ठ, कश्यप ह्या ऋषींनाही दिले जाते. अथर्वशिरस, घोरस्वरूपी अंगिरस, आथर्वण, क्षत्रवेद, ग्रामयाजिन, पूगयज्ञीय, ब्रह्मवेद, भेषज, भृगु अंगिरस, सुभेषज अशी याची विविध नवे आहेत.[१]

शौनकीय व पैपलाद या अथर्ववेदाच्या दोन शाखा आहेत. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदाने स्पर्श केला आहे.

करण्यव्यूहांनी (शौनकीय) अथर्ववेदाच्या नऊ शाखा सांगितल्या अहेत.

  1. पैपलाद (याचा प्रसार नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात झाला)
  1. स्तौद
  2. मौद
  3. शौनकीय (याचा प्रसार नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशात झाला)
  4. जाजल
  5. जलद
  6. कुन्तप
  7. ब्रह्मावद
  8. देवदर्श
  9. करणवैद्य

यापैकी केवल शौनकीय शाखा गुजरात अणि बनारस येथे अस्तित्वात आहे, शेवटच्या काही दशकांन मध्ये ही सर्वत्र विस्तारते होते. आणि ओडिशा येथे पैपलाद ही टिकून आहे. अलीकडील काळात यात काही भर घालण्यात आली, परंतु पैपलादीय सहित्य हे शौनकीय साहित्यापेक्षा प्प्राचीन मानले जाते. अनेकदा अनुरूप स्तोत्रांमध्ये दोन आवर्तनामध्ये वेगवेगळे छंद पाहण्यात येतात, किंवा जे दुसर्‍या ग्रंथामध्ये नाहीत असे काही अधिक स्तोत्र एखाद्या प्रतीत आढळतात. पाच कल्पांपैकी संहिताविधी, शांतिकल्प, नक्षत्रकल्प हे काही कल्प स्वतंत्र शाखा म्हणून नसून दाखले म्हणून शौनकीय परंपरेत आढळतात. अथर्ववेदात विविध कालखंडाचे दीर्घ असे ७२ भागांची परिशिष्टे आहेत, त्यांतील बहुतेक सर्व पुराणकालीन आहेत.

अथर्ववेदाच्या उत्तरार्धात वैनतेय सूत्र आणि कौशिक सूत्र अशा दोन संबधित उत्तर संहिता आहेत.वैनतेय सूत्र हे अथर्ववैदिकांच्या श्रौत्र विधींमधील सहभागासंबधित आहे,तर कौशिकसूत्रातील अनेक सुत्रांमध्ये चिकित्सेसंबधित व तंत्रासंबधित माहिती आहे.ह्यांचा उद्देश ऋग्वेदामधील विधानांन समान आहे आणि म्हणुन अथर्ववैदिक साहित्यातिल उपायुक्ततेचा अभ्यास हा वैदिक काळात बहुमुल्य समजला गेला आहे. यांमध्ये मुडंक आणि प्रश्न उपनिषद हे सर्वधिक महत्वाचे मानले गेले.त्यांतील पहिल्यामध्ये (मुडंकामध्ये)शौनकिय शाखेचा प्रमुख, शौनकांबद्दल महत्वाचा सदंर्भ मिळतो, तर नंतरचा(प्रश्न उपनिषदात) हा पैपलादिय शाखेशी संबंधित आहे.

उपनिषद

वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे.

प्राचीन भारतीय तात्विक विचार  उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.

१.   ईश,२. केन, ३. कठ,४.प्रश्न ,५. मुंडक,६. मांडूक्य ,७.तैत्तिरीय,८. ऐतरेय,९.छांदोग्य,१०. बृहदारण्यक,११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.

वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.

या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.

ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.

सुमारे १०८ च्या आसपास काही गौण उपनिषदे मानली गेली आहेत. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे

उपनिषद सूची-

१३.अक्षमाला १४.अक्षी १५.अथर्वशिखा १६. अथर्व शिरस १७. अद्वयतारक १८.अद्वैत १९.अध्यात्म २०. अन्नपूर्णा २१.अमृतनाद २२.अमृतबिंदू २३ अल्ला २४.अवधूत २५. अव्यक्त  २६.आचमन २७.आत्म २८. आत्मपूजा २९.आत्मप्रबोध ३०. आत्मपूजा

एकशें आठ उपनिषदे

ऋग्वेदाच्या २१ शाखा,

यजुर्वेदाच्या १०९

सामवेदाच्या १०००

आणि

अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदे १०८ आहेत ती अशी :-

१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो – (बिन्दु), ३८ नाद – (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्त्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राजक, ४४ त्रिशिखि – (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा – (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा – (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय – (तारक) ५४ राम – (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्र्ल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङ्गल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र – (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म – (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण – (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण – (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. ” अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम.