वैदर्भिय खा़द्यसंस्कृती

महाराष्ट्रातील उत्तर पूर्व भाग सेंट्रल प्रोव्हीन्समध्ये होता. बुलढाणा ह्या जिल्ह्यापासून भंडारा जिल्ह्यापर्यंत एकूण आठ जिल्ह्याचा हा प्रदेश वÚहाड किंवा विदर्भ म्हणून ओळखला जातो. चमचमीत व तिखट खाण्याकरिता हा भाग प्रसिद्ध आहे. येथील भाज्यांमध्ये तिखटं जास्त तसेच तेलाचं प्रमाणही बरेच असते. तेलात मुखŸवेकरुन जवसाचे किंवा शेंगदाण्याचे तेल वापरण्याची पद्धत आहे. वैदर्भिय लोकं जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही विदर्भाच आदरातिथ्थ्य सर्वश्रूतच आहे. पु.ल. देशपांडेनी सुद्धा याचं वर्णन केलं आहे. बिनधास्त, बेधडक, रांगडया व्यक्तीमत्त्वाचे लोकं येणा-या  जाणा-याशी सहज ओळख पटवून तंबाखूची डब्बी काढून ’’चुन्याची पुडी आहे काजी’’ विचारणारे. कित्येक लोकांना वाटतं की विदर्भातलं जेवण म्हणजे जहाल तिखटंच, पण असं नाही, काही विशिष्ट्य वर्गातील लोकं तिखटं खातात आणि मात्र इथला प्रसिद्ध सावजी प्रकारही तिखटं असतो.

सावजी हा चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचाच. नागपूरला गेलेल्या खवय्यांना हा पदार्थ नेहमीच आवडतो. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी कोष्टी समाजबांधवांनी सावजी प्रकाराला नागपूरात जन्म दिला. आधी नागपूर मध्य प्रदेशांत होतं. कोष्टी लोक मूळचे मध्य प्रदेशाच्या मुलताई, बैतूल, पांढुर्णा, छिंदवाडा आदी भागांतील. हातमाग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. नागपूरात त्या काळी भरपूर मिल्स असल्यामुळे हातमागाचा व्यवसाय जोरात होता. त्यामुळे पोटापाण्यासाठी कोष्टी बांधव नागपूरात आले; यातलेच काही लोक सोलापूरात सुद्धा आले, पण सोलापूरातल्या सावजीची चव वेगळी आणि विदर्भातील सावजीची चव वेगळी. येथेच त्यांनी वेगवेगळया भागांत आपले जीवन स्थायी केले मिलमध्ये दिवसभर मेहनत केल्यानंतर रात्री हे कोष्टीबांधव एकत्र येत दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी काहीतरी विरंगुळा हवा होताच, काय करायंच तर विविध खेळ खेळायचे. मग कुणाच्या तरी डोक्यातून एक कल्पना आली. चविष्ट भोजन तयार करण्याची स्पर्धा घ्यायची. सर्वांना ही कल्पना पटली; पण बनवायचं काय? चेंज म्हणून रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं चमचमीत असलं पाहिजे. मग मांसाहारी पदार्थ बनवण्यांच ठरलं. चिकन, मटण शिजवलं; पण एवढ्यावरच हे बांधव थांबले नाहीत. नंतर कुणी तरी बोकडाच्या खुराची भाजी बनवायला सुरवात केली. जे मासांहारी नाहीत त्यांच्यासाठी कितीतरी शाकाहारी वेगळया पद्धतीचे पदार्थ तयार झाले. येथूनच सावजीला सुरवात झाली.