लाल ठेचा
साहित्य:-
लाल मिरच्या 1 वाटी
लसूण पाव वाटी
लिंबाचा रस 1 चमचा
मीठ अर्धा चमचा
शेंगदाणे तेल 2 चमचे
भाजलेले जीरे 1 चमचा
कृती 1:- सर्व जिन्नस एकत्र करुन ठेचून घ्या.
कृती 2:- सर्व जिन्नस थोडया तेलात परतून कुटून घ्या.
कृती 3:- यामध्ये सुकी लाल मिरची वापरतात, लाल मिरचीचे देठ तोडून पाण्यात उकळून ही मिरची लसूण, भाजलेले जीरे, मीठ याबरोबर कुटतात.
हिरव्या मिरचीचा ठेचा (चटणी)
साहित्य:-
हिरव्या मिरच्याचे तुकडे 1 वाटी
कोथिंबीर 1 वाटी
सोललेला लसूण पाव वाटी
दाणे भाजून सोललेले अर्धी वाटी
मीठ, तेल चवीनुसार
कृती 1:- थोडया तेलावर मिरच्या व कोथिंबीर परतून घ्यावी. त्यात लसूण, शेंगदाणे व मीठ घालून हे मिश्रण जाडसर वाटावं. नंतर यात तेल गरम करुन घालावं की झणझणीत ठेचा तयार. (हा ठेचा भाकरीबरोबर खातात. ज्यांना तूप तिखट खायला आवडतं. ते दाणे न घालताच हा ठेेचा करतात. कच्चं तेल घालूनही हा खाल्ला जातो.)
कृती 2:- सर्व जिन्नस एकत्र करा व पाटया वरवंटयावर किंवा खलबŸयात कुटून घ्या.
पंचामृत
साहित्य:-
चिंचेचा कोळ 2 वाटया
गूळ 1 वाटी
मोहरी 1 चमचा
हिंग अर्धा चमचा
दाण्याचा कुट पाव वाटी
खोब-याचे तुकडे पाव वाटी
तीळ 2 चमचे
शेंगदाणे 4 चमचे
कढीपत्ता –
मीठ चवीनुसार
मिरच्यांचे तुकडे –
तिखट 1 चमचा
हळद अर्धा चमचा
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
शेंगदाणे तेल 3 चमचे
मेथीदाणे अर्धा चमचा
गरम मसाला 1 चमचा
कृती:- तेल तापल्यावर त्यात मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, हिंग, मेथीदाणे परतून नंतर शेंगदाणे, खोब-याचे तुकडे इत्यादी घालून परतावे. नंतर चिंचेचा कोळ आणि हळद, तिखट, धणे-जीरे पावडर, गरम मसाला, गूळ घालून चांगले उकळवावे. घट्ट झाल्यावर उर्वरीत बाकी जिन्नस घालून थंड करावे.