चंद्रपुरी वडा

साहित्य:-

भिजलेली चणाडाळ 2 वाटया
बारीक चिरलेला कांदा 2 वाटया
बारीक चिरलेली मिरची 2 ते 3
बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
भरडलेले धणे 2 चमचे
हळद अर्धा चमचा
तिखट, मीठ चवीनुसार
आलं लसूण पेस्ट 2 चमचे
तेल तळायला

कृती:- डाळ भिजवून वाटून घेणे. त्यात सगळे जिन्नस घालून पाण्याच्या हातानी त्याचे गोल वडे करुन तेलात हाफ फ्राय करुन घेणे. सव्र्ह करतेवेळी या गोल वडयांना पुन्हा पाण्याच्या हातानी चपटे करुन मंद आचेवर डीप फ्राय करा. तळलेल्या मिरची बरोबर सव्र्ह करा.
टीप:- गोल वडा चपटा केल्यानंतर दुसÚयांदा तळल्यामुळे जास्त खुसखुशीत होतो. यातच मेथीच्या सीझनमध्ये हिरवी मेथी घालून करु शकतो.

कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडीच्या आवरणासाठी साहित्य:-

बेसन 1 वाटी
मैदा 2 चमचे
आरारोट किंवा काॅर्नस्टार्च 1 चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार

कृती:- सर्व जिन्नस एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून 1 चमचा तेल घालावे व मळून गोळा तयार करुन घ्यावा.

मसाल्या करीती साहित्य:-

तेल 2 चमचे
आलं-लहसूण पेस्ट 1-1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
जीरे पावडर 1 चमचा
गरम मसाला 1 चमचा
आमचूर पावडर अर्धा चमचा
साखर चवीनुसार
भाजलेली खसखस 1 चमचा
दाण्याचा कुट 4 चमचे
खोबरा कीस अर्धी वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा किलो
बेदाणे 2 चमचे

कृती:- दोन चमचे तेलात आलं-लसूण पेस्ट घालून त्यात हळद, तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार साखर घालावी. नंतर त्यात दाण्याचा कुट, 1 चमचा भाजालेली खसखस व बेदाणे घालवे. त्यानंतर खोबरा कीस घालून थोडस परतून थंड झाल्यावर हा मसाला अर्धा किलो बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये घालावा. नंतर बेसनाच्या गोळयाची पोळी लाटून त्यावर गरम मसाला व अर्धा चमचा आमचूरचे पाणी करुन लावा.े त्यावर हा मसाला पसरुन याचे रोल करावे व दोन्ही कडा ओल्या पाण्यानी बंद कराव्यात व मंद आचेवर तळून घ्याव्यात.

लसणाचे आक्षे

साहित्य:-

हिरवा लसूण 2 गाठया
तांदूळ 2 वाटया
मुळा 1 नग
जीर 1 चमचा
मीठ चवीनुसार
हिरवी चिरलेली कोथिंबीर 1 चमचा

कृती:- तांदूळ 1 तास भिजत ठेवणे. त्यानंतर धुतलेला मुळा, हिरवी लसूण, जीरे या बरोबर वाटून घेणे. तव्यावर तेल लावून, हाताने थापून दोस्यासारखे परतून घेणे. चणे, डाळीच्या चटणीबरोबर खायला देणे.

सांबार टिक्का

साहित्य:-

ज्वारीचे पीठ 1 वाटी
बेसन 2 वाटया
कणिक 1 वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा किलो
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
धने-जीरे पावडर 2 चमचे
आमचुर पावडर 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार
सौप 3 चमचे
तीळ 2 चमचे

कृती:- पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट परतून नंतर धने-जीरे पावडर, हळद, तिखट व सर्व पीठे घाला. थोडे भाजून कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ, साखर घालून थोडे गरम पाणी घाला व चांगले वाफवून घ्या. थंड झाल्यावर हाताने छोटया टिकीया करुन मंद आचेवर तळा.