गोळा भात

साहित्यः-

चिन्नोर तांदूळ 2 वाटया
बेसन 1 वाटी
धनेजीरे पावडर 2 चमचे
तिखट, हळद, हिंग, मोहरी फोडणीकरीता
कढीपत्ता -तेल –

कृती गोळयांसाठी:-

प्रथम बेसनात हळद, तिखट, चवीनुसार मीठ, धने, जीरे पावडर, घालून एकत्र मिसळून घ्या. तेलाचे भरपूर मोहन घालून गोळा होईल इतपत भिजवा हाताच्या मुठीच्या आकाराचे गोळे बनवा आपण नेहमीप्रमाणे जसा भात शिजवतो तसा शिजवा, शिजवायला त्यात थोडी हळद, मिठ घाला. भात अर्धवट शिजत आला की त्यात वरील तयार केलेले गोळे घालून मंद आचेवर शिजवा. वरुन मोहरी जिरे-कढीपत्ता हिंगाची फोडणी घाला व चिंचेच्या कढीबरोबर खायला द्या.
टीप:- भात वाढताना गोळयंाबरोबर वाढा व वरुन फोडणी घाला जास्त चवीष्ट लागते

 भरडा भात

साहित्य:-

शिजवलेला भात 2 वाटया
जाडसर वाटलेला चण्याच्या डाळीचा भरडा 1 वाटी
जिरे पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
तिखट, हिंग, मोहरी, तेल, कढीपत्ता

कृती:- प्रथम थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, धने जीरे पावडर, हळद, तिखट इ. घालून डाळीचा भरडा घालून खरपूस भाज्या त्या नंतर यात मीठ जरुरीपूरते गरम पाणी घालून वाफ येऊ द्या. शिजवल्यावर हा भरडा भाताबरेाबर कालवून खायच्या वेळी असा हा कालवलेला भात. त्यावर हिंगाचे पाणी वरुन मोहरी-लसणाची फोडणी घालून कढीबरोबर मसाल्याच्या मिरचीबरोबर खायला द्या.

 पाया खूर

साहित्य:-

पाया 8 नग
कांद्याचे वाटण 200 ग्रॅम
आलं-लसूण पाणी 1 वाटी
लाल मिरच्या 8-10
बडी शोप 1 चमचा
मोठी विलायची 4-5
लवंग 2 चमचे
जायपत्री 1 चमचा
काळी मिरी 2 चमचे
शहाजीरे 2 चमचे
धने 5 चमचे
खसखस पाव वाटी
खोबरेल तेल 1/2 वाटी
तिखट 2 चमचे
तेजपान 4-5
हळद 1 चमचा
मीठ चवीनुसार
स्टारफूल 3-4
दालचिनी 1 चमचा
हिरवी विलायची 8-10

कृती:- पाया बाजारातून आणल्यावर त्याला एकतर स्वच्छ करुन मागावे किंवा बाजारातून आणलेले पाया स्वच्छ धुऊन निखा-यावर भाजून नतंर गरम पाण्यात थोडा वेळ उकळावे. बाहेर काढून सोलून त्याचे तुकडे करावे. त्यात हळद, मीठ, आलं-लसूण पेस्ट 2 चमचे व तेजपान घालून कुकरला 9 ते 10 शिट्टया होईपर्यंत शिजवावे. कुकरकमध्ये पाणी थोडे जास्तच घालावे.
कांदा व लसूण सोडून सर्व मसाले वेगवेगळे लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात भिजवावेत. 10 मिनिटे पाण्यात उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून प्रथम आलं-लसूणचे पाणी टाकून ते शिजवल्यावर कांद्याचे वाटण तसेच वरील वाटलेला मसाला व तेजपान घालावे, थोडेसे पायाचे शिजवलेले पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळावे. नंतर शिजवलेले पाया व हळद, तिखट टाकावे. वरुन थोडी कोथिंबीर घालावी आणि सव्र्ह करा.

पुरण पोळी

साहित्य:-

हरभरा डाळ 3 वाटया
गूळ 2 वाटया
साखर 1 वाटी
जायफळ पावडर अर्धा चमचा
वेलची पावडर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कणीक 1 वाटी
मैदा 1 वाटी
साजूक तूप
तेल 2 चमचे

कृती:-

सर्व प्रथम एका भांडयात 4-5 वाटया पाणी घालून हरभरा डाळ शिजवून घ्या. डाळ शिजत आल्यावर त्यात गूळ व साखर घालावा. गूळ आणि साखर मिसळल्यावर डाळ चांगली शिजली की ती गॅसवरुन खाली उतरुन घ्या. नंतर पुरण्याच्या साच्यातून तिला बारीक करुन घ्या. त्यात थोडे जायफळ पावडर व वलेची पुड सुद्धा घाला.
कणीक, मैदा, थोडं मीठ मिसळून 2 चमचे तेल घालून चांगले भिजवून मळून घ्यावे. त्यानंतर एका गोळयाची पोळी लाटून त्यावर तयार केलेले पुरण पसरवा चारही बाजूंनी पोळी गुंडाळून बंद करा व थोडी लाटून घ्या. तव्यावर तूपाच्या साहाय्याने खरपूस भाजून साजूक तूपाबरोबर सव्र्ह करा.