मुगवडीची भाजी
साहित्य:-
मुंगडाळ 2 वाटया
आलं 2 चमचे
लसूण 2 चमचे
हिरवी मिरची 5-6
चिरलेला कांदा पाव वाटी
भाजलेली खसखस 3 चमचे
धने-जीरे पावढर 2 चमचे
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
मीठ चवीनुसार
तमालपत्र 2-3
कृती:-
मुगवडी करीता मुंग डाळ पाण्यात भिजवून वाटून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून छोटे छोटे वडे उन्हात वाळत घाला. कडकडीत वाळल्यावर डब्ब्यात भरुन ठेवा. किंवा या वडया बाजारात सुद्धा मिळतात. फ्रायपॅनमध्ये थोडे तेल टाकून या वडया परतून घ्या. त्याच तेलात थोडी आलं, लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, 3 चमचे भाजून वाटलेली खसखस, धने-जीरे पावडर, हळद, तिखट, तमालपत्र व्यवस्थित परतून घ्या. थोडे पाणी घालून तळलेल्या मुंगवडया घाला चवीनुसार मीठ सुद्धा घाला. वडया शिजत आल्या की गरम मसाला व कोथिंबीर सव्र्ह करा.
लंबी रोटी
साहित्य:-
कणीक (लोकवान गव्हाची) 1 किलो
मीठ 15 ग्रॅम
तेल 4 चमचे
कृती:-
लंबी रोटी करीता लोकवान नावाच्या गव्हाचे पीठ लागते. गव्हाचे पीठ थोडे पातळसर भिजवून त्यात एका किलोला साधारण 15 ग्रॅम मीठ घालावे. नंतर चांगल्याप्रकारे त्याला तार येईस्तोवर फेटावे. एका उलटया माठावर खालून जाळ लावावा व त्या माठाला तेल लावून घ्यावे. नंतर हे तयार पिठ हातात घेवून माठावर पसरावे. चिकट पणामूळे दोस्यासारखे पसरते. व नंतर वाटल्यास थोडे तेल लावावे. लगेच काढून खायला दिले तर ती पोळी कडक राहाते. पण बनवून ठेवलेल्या पोळया नरम होतात.