डाळ गंडोरी

साहित्य –

तूर डाळ पाव किलो
मिरव्या मिरच्या 15 ते 20
शेंगदाणे 4 चमचे
धणे-जीरे 1-1 चमचा
मोहरी 1 चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार

कृती –

सर्व प्रथम पाव किलो तूरीची डाळ व 20 हिरव्या मिरच्या एकत्र शिजवून घ्या. शेंगदाणे, धणे, जीरे, कढीपत्त्याची चटणी बनवून घ्या. पॅनमध्ये मोहरी फोडणीला घालून त्यामध्ये ही चटणी परतून घ्या. त्यानंतर शिजवलेली डाळ व मिरच्या घाला. थोडी हळद सुद्धा घाला. चवीनुसार मीठ घालून सव्र्ह करा.

 उपासाचे मुटकुळे

साहित्य:-

साबुदाणा पीठ 1 वाटी
व-याच्या तांदूळाचे पीठ 1 वाटी
शिंगाडयाचे पीठ 1 वाटी
मीठ, लिंबू साखर चवीनुसार
हिरवी मिरची –
दाण्याचा कुट पाव वाटी
जिरे 1 चमचा
उकडलेला बटाटा 1 नग

कृती:-

सर्व प्रथम 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी व-याच्या तांदूळाचे पीठ व 1 वाटी शिंगाडयाचे एकत्र करुन त्यात चवीनुसार मीठ घालून त्याच्या भाक-या बनवून घ्या. नंतर त्या भाक-या बारीक करुन त्यात बटाटा मिसळा. नंतर मिश्रणाचे मुटकुळे बनवून एक वाफ आणून घ्या. त्यावर जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर याची फोडणी घालून बोराच्या भाजी बरोबर खायला द्या.

बोराची भाजी

साहित्य:-

सुके बोर 1 वाटी
गूळ अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
भाजलेले दाणे अर्धी वाटी
जिरे 1 चमचा
हिरवी मिरची 1 चमचा
कोथिंबीर –

कृती:-

सर्व प्रथम 1 वाटी प्रथम बोर 4 तास पाण्यात भिजवून उकडून घ्यावे. नंतर त्यातील बीया काढून घ्याव्यात. त्यानंतर गूळ, मीठ, अर्धी वाटी दाणे मिसळवून वरुन जिरे व मिरचीची फोडणी द्या. वरुन थोडी कोथिंबीर घालून मुटकुळयांबरोबर खायला द्या.

अळू वडी

साहित्य:-

अळूची मोठी पान 2 नग
बेसन 1 वाटी
नारळाचे दूध 1 वाटी
आलं,लसूण पेस्ट 2 चमचे
तिखट, मीठ चवीनुसार
तेल तळायला
चिंचेचा कोळ 1 चमचा
गुळ 1 चमचा

कृती:-

बेसनात सर्व जिन्नस मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करुन ती अळूच्या पानाला लावावी. त्यावर दुसरे पान ठेवून परत पेस्ट लावावी. पुन्हा त्यावर तिसरे पान ठेवावे व पुन्हा पेस्ट लावावी व याची गोल गुंडाळी करुन ही गुंडाळी वाफवून घ्यावी. वाफवून घेतल्यावर त्याचे गोल काप करुन त्या वडया तळून घ्याव्यात.

 तोंडली भात

साहित्य:-

तोंडली 2 वाटया
तांदूळ 2 वाटया
हिरवा मसाला 4 चमचे
(हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिÚयाची पेस्ट)
बेसन अर्धी वाटी
शहाजीरे 1 चमचा
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
तेजपान 3-4
खडा मसाला 2 चमचे
दही पाव वाटी

कृती:-

2 वाटया तोंडली धुऊन कापून ठेवा व त्यात हिरवा मसाला (हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिÚयाची पेस्ट) भरा. पॅनमध्ये तेल गरम करुन मसाल्याची तोंडली बेसनाच्या द्रावणात बुडवून घ्यावी व तळून बाजूला ठेवावी एका भांडयात थोडेसे तेल घेऊन त्यात शहाजीरे, आलं लसूण पेस्ट, तेजपान, 2 चमचे खडा मसाला, पाव वाटी दही, घालून पाणी घालावे. पाणी उकळल्यानंतर त्यात तांदूळ 2 वाटया घालावे. तांदूळ शिजत आल्यावर तळलेली तोंडली घालावी. मंद आचेवर शिजवावे. मठ्ठयाबरोबर खायला द्यावे.

गव्हाची खीर

साहित्य –

गहू पाऊण वाटी
दूध 3 वाटया
पाणी 1 वाटी
साखर पाऊण वाटी
चारोळी 4 चमचे
वेलची पावडर 1 चमचा

कृती –

सर्व प्रथम गहू बारा तास पाण्यात भिजत घाला. नंतर त्याला मोड आणा. मोड आल्यानंतर 1 वाटी पाण्यात पाव चमचा मीठ घालून गहू उकळत ठेवा. थोडे शिजल्यावर त्यामध्ये दूध घालून आटवा. जेव्हा गहू पूर्णपणे शिजतील तेव्हा साखर, वेलची पूड व चारोळी घाला. साखर विरघळल्याव गरम गरम खीर खायला दया.

 डिंकाचे लाडू

साहित्य –

डिंक 2 वाटया
सुक्या खोबÚयाची कीस, 3 वाटया
खारकाची पूड 3 वाटया
खसखस आर्धी वाटी
कणिक 1 वाटी
तूप 2 वाटया
किसलेला गूळ 3 वाटया
पीठी साखर 1 वाटी
जायफळ पूड 1 चमचा

कृती –

डिंक जाडसर कुटावा, खारका कुटून बारीक पूड करावी. बदाम सोलून पूड अथवा काप करावेत, खसखस गुलाबी रंगावर भाजून तिचा बारीक कूट करावा. कणिक तूपावर खमंग भाजावी, खोबरे किसून भाजून हाताने कुस्करून घ्यावे. कढईत तूप गरम करूल थोडा थोडा डिंक घालून फुलवून तळून घ्यावा. परातीत तळलेला डिंक, खारीक पूड, बदाम काप, कुटलेली खसखस, जायफळ पूड, खोबरे सर्व एकत्र चांगले कालवावे. त्यात तीन वाटया किसलेला गुळ व साखर मिसळावी. फार कोरडे वाटले तर 2 चमचे साजूक तूप गरम करून घालावे व मध्यम आकाराचे लाडू वळावेत.