साखरेचे मांडे

साहित्य:-

मैदा 1 वाटी
कणीक अर्धी वाटी
मीठ छोटा पाव चमचा
तेल 2 चमचे
तूप अर्धी वाटी
पीठी साखर अर्धी वाटी

कृती:-

कणकीमध्ये मीठ व तेल घालून गोळा सैलसर भिजवून घ्या. अर्धा ते पाऊण तास मुरत ठेवा. त्यातला एक गोळा घेवून त्यामध्ये पीठी साखरेचे मिश्रण घाला. पुरणाच्या पोळी प्रमाणे बंद करुन पोळी लाटा. सवयीप्रमाणे हाताने पसरवून उलटया तव्यावर शेकून घ्या. लगेच घडी करुन ठेवा. कारण यात साखर असल्यामूहे ती लगेच कडक होते.

कैरी भात

साहित्य:-

तयार भात 2 वाटया
किसलेला कैरी 1 वाटी
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर –
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
लसूण 1 चमचा
हळद, हिंग पाव चमचा

कृती:-

भात थंड पाण्याच्या हाताने मोकळा करुन त्यात किसलेली कैरी, मीठ, साखर, कोथिंबीर एकत्र करुन घेणे. त्यानंतर कढईमध्ये तेल घेवून त्यात मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण घालून परतणे. गॅस बंद करुन त्यात हळद व हिंग घालणे. नंतर ही फोडणी तयार केलेल्या भातावर ओतून कालवून घेणे व नंतर सव्र्ह करणे.

कुरडयाची भाजी

साहित्य –

कुरडयांचा चुरा 3 वाटया
हळद, तिखट, हिंग चवीनुसार
चिरलेला लसूण 2 चमचे
कांदा अर्धी वाटी
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

कुरडया पाण्यात भिजवून ठेवा साधारण 1 तास. 4 चमचे तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण, कांदा चांगले परतवून घ्या. नंतर यात चवीनुसार हळद, तिखट घालून भिजवलेल्या कुरडया घाला. चवीनुसार मीठ व साखर घालून चांगले परतून घ्या. गरम पडल्यास एक पाण्याचा शिबका सुद्धा मारा. कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

 खान्देशी हिरव्या मिरचीचा ठेचा

साहित्य:-

मिरव्या मिरच्याचे तुकडे 1 वाटी
कोथिंबीर 1 वाटी
सोललेला लसूण पाव वाटी
दाणे भाजून सोललेले अर्धी वाटी
मीठ, तेल –

कृती:-

थोडया तेलावर मिरच्या व कोथिंबीर परतून घ्यावी. त्यात लसूण, दाणे व मीठ घालून हे मिश्रण जाडसर वाटावं. नंतर यात तेल गरम करुन घालावं की झणझणीत ठेचा तयार. (हा ठेचा भाकरीबरोबर खातात. ज्यांना तूप तिखट खायला आवडतं. ते दाणे न घालताच हा ठेेचा करतात. कच्चं तेल घालूनही हा खाल्ला जातो.)

घारीपुरी

साहित्य –

कणीक 1 वाटी
ज्वारीचे पीठ अर्धी वाटी
ताक 1 वाटी
गूळ चवीनुसार
मीठ चवीनुसार
मिरपूड 1 चमचा
वेलची पूड अर्धा चमचा
तेल 4 चमचे

कृती –

ताक व पाणी अर्धे-अर्धे घेऊन एकत्र मिसळा. मीठ, मिरपूड थोडा गूळ घाला. उकळी आल्यावर त्यात कणीक व ज्वारीचे पीठ घाला. झाकण लावून वाफ येऊ द्या. परातीत तेल घालून पीठ चांगले मळून घ्या. त्याच्या पु-या लाटून त्याला टोचे मारा व तेलात तळून खायला दया.

मटनाचे कालवण

साहित्य –

मटन पाव किलो
सुके खोबरे 1 वाटी
लकान कांदे 3 नग
टोमॅटो 1 नग
लसूण 2 चमचे
आलं 1 चमचा
कोथिंबीर 4 चमचे
धने 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
तिखट चवीनुसार
मीठ, हळद चवीनुसार
हिंग पाव चमचावाटण – खोबरे व कांदे थोडया तेलावर परतून वाटा तसेच आलं-लसण-कोथिंबीर वाटून ठेवा.

कृती –

तेलात फोडणीचे साहित्य घालून फोडणी घाला. नंतर हिंग व टोमॅटो घालून छान परतवा. तेलाचा छान तवंग आल्यावर वाटलेला मसाला घालून परतावा. नंतर त्यात मटण घालून आवश्यक ऐवढे पाणी घालून चांगले शिजवा.