मालवणी सुका मसाला

साहित्य:-

बेडगी मिरची 10-12
काळे चने 4 चमचे
धने 1 वाटी
(काळी मिरी, लवंग, दालचिनी, दोडे,
दगडफूल, हळद, शोप, जावित्री,
बादलफूल, मोहरी, तिरफळ, शहाजीरा) प्रत्येकी 1 चमचा
कांदे 300 ग्रॅम
खसखस 1 वाटी
सुके खोबरे 1 वाटी
कांदे उभे कापलेले 3
आमसुल 3-4

कृती:-

वरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करुन भरणीत भरुन ठेवा. वापरते वेळी वरील मसाल्याच्या प्रमाणात सव्वा वाटी ओले खोबरे आलं लसणाचे वाटण अर्धा वाटी घेवून मालवणी पद्धतीची ग्रेव्ही तयार करावी.

मालवणी चिकन

साहित्य:

बारीक मिरची 10-12
काळे चने (भिजवून वाटलेले) 1/2 वाटी
नारळाराचे दूध 2 वाटया
धने 1 वाटी
(काळी मिरी, लवंग, दालचिनी, दोडे,
दगडफूल, हळद, शोप, जावित्री,
बादलफूल, मोहरी, त्रिफळ, शहाजिरा) प्रत्येकी 1 चमचा
कांदे 300 ग्रॅम
आलं-लसूण वाटण 1/2 वाटी
खसखस वाटलेली दीड वाटी
सुके खोबरे 1 वाटी
ओले खोबरे सव्वा वाटी
कांदे उभे कापलेले 3
आमसूल 3
गरम मसाला 1/2 चमचा
चिकन 1 नग

कृती:

पातेल्यात तेल घालून गरम झाल्यावर शहाजिरे, आलं-लसूणाचं वाटण टाकावे त्यानंतर कांदा व खसखस, खोबरे (ह्यात ओले व सुके खोबरे वेगवेगळे भाजून घालावे.) उरलेल्या सर्व मसाल्याची भाजून पेस्ट करावी. ही पेस्ट व काळया चण्याची पेस्ट घालून वरुन थोडेसे पाणी घालावे. मिश्रणाला तेल सुटू लागल्यावर त्यात हळद घालून मिश्रण आमसूल घालून उकळावे, चवीनुसार मीठ घालून. नंतर त्यात चिकन चे तुकडे घालून शिजेस्तावर उकळवावे.

टीप: ही ग्रेव्ही ताजी करुनच वापरावी, फ्रीजमध्ये टिकणार नाही.

सोलकढी

हा पण कोकण पट्टीतला प्रकार. पेयाचाच एक छान प्रकार. यात मुख्य आमसूल (कोकम) व नारळाचं दूध वापरतात. कोकणात वेगवेगळया भागात वेगवेगळया प्रकारांची सोलकढी बनवण्याची पद्धत आहे, माझ्या पाहण्यातच 5 ते 6 प्रकार आले त्यातलाह एक.

साहित्य:-

नारळाचे दूध 4 ते 5 वाटया,
आमसुचाला गर अर्धी वाटी
लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर 2 चमचे
(वाटून तयार केलेली चटणी)
जीरे पूड 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार

कृती:-

2 ते 3 नारळ खवून त्याचं दूध काढून घेणे. आमसुलं भिजवून त्याचा गर काढणे. हिरव्या मिरच्या 2 ते 3, घेऊन (चवीनुसार) त्यात 5 ते 6 लसूण पाकळया, कोथिंबीर घालून वाटून घ्यावे. ही चटणी 2 ते 3 चमचे, दूध, कोकम गर एकत्र करुन ठेवणे. चवीनुसार मीठ, साखर व जीरे पूड पावडर घालून सव्र्ह करणे.
टीप:- आमसुले ताजी असली तर सोलकढीला रंग छान येतो.

काळया वाटाण्याची आमटी

साहित्य:-

काळे वटाणे 1 वाटी
त्याच्या बरोबर ओले खोबरं 1 वाटी
सुके खोबरे 1 वाटी
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
कांदा 1 नग
तेल –
यात घालण्याच्या गरम मसाल्याकरिता
खसखस दीड चमचा
दालचिनी तुकडे 2
जायपत्री 1
काळी मिरी 7-8
लवंग 4-8
या सर्वांना थोड्याश्या तेलात परतून मसाला वाटून घ्यावा.

कृती:-

वाटाणे रात्रभर भिजवून सकाळी कुकरमधे थोडासा कांदा घालून मऊशार शिजवणे. यानंतर बारीक चिरलेला कांदा तेलात घालून व तयार केलेला मसाला घालून परतावे. खोबरे खमंग वेगळे भाजून घालावे. वाटाणा शिजल्यावर त्यातील थोडेसे वाटाणे वेगळे काढून वाटून घ्यावे. वाटलेल्या वाटाण्याचे मिश्रणात हळद, 1 चमचा तिखट, चवीला मीठ व थोडेसे पाणी घालून शिजवावे. यात वाटलेलं खोबरं व शिजलेले वाटाणे घालून उकळी येवू दयावी. कुणाला आंबट गोड चव हवी असेलं तर 2-3 आमसुलं व साखर घालावी.

खदखद

साहित्य:-

तूरीची डाळ 1 वाटी
मध्यम आकाराचे बटाटे 4 नग
कच्चे केळे 2 नग
सोललेल्या ऊसाचे लहान आकाराचे तुकडे 10 – 12
लाल माठाच्या देठाचे तुकडे 10 – 12
आवडत असल्यास सुरण –
लाल भोपळ्याचा तुकडा 1
मध्यम आकाराची रताळी 2 नग
तिखट, मीठ, गुळ, चिंच चवीनुसार
हळद –
खोबरे –
तिरफळ अर्धा चमचा
चिंचेचा कोळ 2 चमचे
खोबरेल तेल 5 चमचे

कृती:-

शिजवलेल्या तूरीच्या डाळीत साले काढलेले सुरण, केळ, भोपळा, रताळी व सालासकट बटाटे व कणासाचे तुकडे सुद्धा घालावे. व हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवावे. यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ, गुळ, घालावे. त्यानंतर चिंचेचा कोळ घालून ओले खोबरे आणि तिरफळ ठेचूव घालावेत. हा रस्सा जास्त पातळ नको. वरुन थोडे खाबरेल तेल घालावे व झाकण ठेवावे. हे खतखत खिचडी बरोबर खूप छान लागतं.