नारळाच्या दुधातल्या शेवया
साहित्य:-
तांदळाचे पीठ 2 वाटया
मीठ चवीनुसार
तेल 2 चमचे
नारळाचे घट्ट दूध 4 वाटया
गुळ चवीनुसार
वेलची पावडर –
कृती:-
2 वाटया उकळत पाण्यात मीठ व एक चमचा तेल घालून पाणी चांगल उकळलं की, त्यात तांदळाचे पीठ घालूव ढवळून चांगले घट्ट झाकण बसवून वाफ आणावी. अशा प्रकारे तांदूळाची उकड करुन घ्यावी. थोडी थंड झाल्यावर तेलाच्या हाताने उकड चांगली मळून त्याचे लांब गोळे करावे. दुसÚया भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात चवीनुसार मीठ घालून हे गोळे 10 मिनिटे उकळावे. गरम असतांनाच शेवयाच्या साच्यामध्ये घालून शेवया पाडाव्या. नारळाच्या दुधात गुळ व वेलची पावडर मिसळून दूध थंड करावे. सव्र्ह करते वेळी एका बशीत शेवया घालून त्यावर नारळाचे दूध घालावे. व भरपूर दूधाबरोबर या शेवया खाव्या. अप्रतीम लागतात.
पापलेटचं कालवण
साहित्य:-
ताज पापलेट 1 नग
एक ओल्या नारळाचा चव –
हळकुंड 1
मोठ्या लाल सुक्या मिरच्या 4-5
धने 1 चमचा
मीठ चवीनुसार
चिंचेचा कोळ 2 चमचे
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
तेल 3 चमचे
कृती:-
पापलेटच्या डोक्याकडचा व शेपटीचा भाग कापून टाकावा. दोन भाग करुन आतला भाग साफ करुन घ्यावा. गाभोळी असेल तर ती वापरावी. पापलेट उभा कापून त्याचे तुकडे करावे. तुकडे धुवून त्याला मीठ लावून अर्धा तास ठेवावे. त्यामुळे त्याचा वास चालला जाईल. हळद, सुकी मिरची, धने याचे वाटण करावे. खोबÚयाचे वाटण वेगळे करावे. थोड्या खोबÚयाचा जाड रस काढावा. पातेल्यात तेल घेऊन बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून मऊ परतून घ्यावा. त्यानंतर मसाल्याची पेस्ट घालून थोडे पाणी घालून उकळावे. त्यानंतर पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून त्यात घालावे. तसं पापलेट शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. नंतर चिंचेचा रस, चवीनुसार तिखट, मीठ घालावे. शेवटी जाड नारळाचे दूध व कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर सव्र्ह करा.
फणसाची ग-या गोट्याची भाजी
साहित्य:-
कच्चा पण जून फणस 1
हिरव्या मिरच्या 4-5
खोबरे पाऊण वाटी
हळद, मीठ, साखर चवीला
हिंग पाव चमचा
मोहरी 1 चमचा
तेल –
कृती:-
फणस सोलून गरे साफ करुन आतील आठल्याचे वरचे साल काढून तुकडे करावेत. फणसाच्या सालीच्या आतला भाग घ्यावा व त्याचे तुकडे करावेत. तेलात हिंग, मोहरीची फोडणी घालून त्यात फणसाच्या आठळ्या व फणसाच्या सालीचे तुकडे घालून परतावे. थोडेसे पाणी आणि हळद घालावे. चवीनुसार मीठ व साखर घालावी. हिरवी मिरची व खोबरे एकत्र वाटून ते त्यात घालावे. एक वाफ आणून खायला द्यावे.
काकडीचं धोंडस
साहित्य:-
काकडी 1 वाटी
तांदळाचा रवा अर्धी वाटी
ओले खोबरे पाव वाटी
गूळ पाव वाटी
वेलची पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
तूप 4 चमचे
कृती:-
काकडी किसून घ्यावी. तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा. पातेल्यात 2 चमचे तूप घालून त्यात काकडीचा कीस तसेच बारीक केलेला गूळ घालावा. ओले खोबरे थोडेसे घालावे. चवीला मीठ, भाजलेला रवा घालून सर्व एकत्र कालवून ठेवावे. तसेच वेलची पावडर घालावी. मिश्रण थलथलीत असावे. फार घट्ट असेल, तर थोडेसे पाणी घालावे. पसरट अॅल्युमिनियम किंवा नाॅनस्टीक फ्रायपॅनमध्ये घालून वर-खाली विस्तव ठेवून भाजावे. ओव्हनमध्ये भाजले तरी चालेल.
बांगड्याचे सुके
साहित्य:-
बांगडे 6 नग
धने 1 चमचा
लसूण 8-10 पाकळया
कांदा 1 वाटी
तिखट दीड चमचा
हळद अर्धा चमचा
लहान लिंबाऐवढी चिंच –
तेल अर्धी वाटी
तिरफळे बिया काढून ठेचलेली 8-10
मीठ चवीनुसार
हळदीची अगर केळीची पाने किंवा पत्रावळ
कृती:-
बांगडे नीट साफ करुन त्याचे प्रत्येकी साधारण 3 ते 4 तुकडे करावेत. तुकडे धुऊन त्याला मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे. धने, हळद, तिखट, मीठ, चिंच, लसूण सर्व एकत्र बारीक वाटावे. बांगड्याचे तुकडे धुऊन त्याला वाटलेला मसाला लावावा. तिरफळे ठेचून घालावीत. कच्चेच तेल बांगड्यात मिसळावे. पसरट थाळ्यात खली पान घालून त्यावर बांगडे पसरुन वरती परत पान घालून झाकण ठेवावे. वर-खाली विस्तव ठेवून 10 ते 15 मिनिटे मंद भाजावे. ओव्हनमध्ये भाजले तरी चांगले. हे सुके 3 ते 4 दिवस टिकते.
तळलेली सुरमई
साहित्य:-
मोठया सुरमईचे बेताचे तुकडे अर्धा किलो
लसूणपाकळया 15-20
चिरलेली कोथिंबीर 1 वाटी
तिखट 1 चमचा
धने 1 चमचा
आमसुल 4
मीठ, हळद –
तांदळाचं पीठ –
खोबरेल तेल –
कृती:-
सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन त्याला थोडं मीठ, हळद लावून ठेवावं. धने तिखट, आमसुल, लसूण कोथिंबीर याची थोडं मीठ, हळद घालून बारीक गोळी वाटावी. ती तुकडयांना लावून ते तासभर मुरत ठेवावे. नंतर हे तुकडे तांदळाच्या पिठात दाबून घोळवावे. खोलगट तव्यावर खोबरेल तेल रिफाइन्ड तेलात तळावे.