कुळथाचं पिठलं
साहित्य:-
कुळथाचे पीठ 1 वाटी
दही अर्धी वाटी
लसूण 2 चमचे
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
तेल 4 चमचम
मीठ चवीनुसार
कोथिंबीर –
कृती:-
4 चमचे तेलात 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडे हिंग, हळद घाला व 2 वाटया पाणी घाला. अर्धी वाटी दह्यात 1 वाटी कुळथाचं पीठ घालून पेस्ट बनवा. हे मिश्रण फोडणी दिलेल्या पाण्यात ओता. चवीनुसार मीठ घालून मिश्रणाला उकळी येवू दया. थोडी कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर सव्र्ह करा.
उंबर
साहित्य:-
कणीक 1 वाटी
गुळ अर्धी वाटी
ओलं नारळ अर्धी वाटी
वेलची पूड चिमुटभर
तेल तळायला
खसखस 4 चमचे
नारळाचे दूध अर्धी वाटी
कृती:-
ओलं खोबरं, कणीक, गुळ, वेलची पूड एकत्र मिसळून दहा मिनिटे ठेवावे. त्याला थोडं पाणी सुटेल, नंतर जरुरीपुरते नारळाचे दुध घालून या मिश्रणाचे उंबरासारखे छोटे-छोटे गोळ बनवावे. नंतर यांना खसखसमध्ये बुडवून मंद आचेवर तळावे.
तांदूळाचे फरे
साहित्य:-
तांदूळीची पीठी 2 वाटया
भिजवलेली उडीदाची डाळ अर्धी वाटी
बडीशोप 2 चमचे
आलं पेस्ट 1 चमचा
कोथिंबीर
जीरे 1 चमचा
मीठ चवीनुसार
लिंबू चवीनुसार
साखर चवीनुसार
साजूक तूप तळायला
कृती:-
तांदळाच्या पीठात मीठ, 2 चमचे तेल टाकून छान मळून घ्यावे. भिजवलेल्या उडदाच्या डाळीला जाडसर दळून त्यात सोप, जीरे पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर टाकून सारण तयार करणे. तांदळाच्या पीठाचा गोळा लाटून (पुरीच्या आकाराचा) त्यावर मधे हे सारण ठेवावे. मधून दुमडून करंजीसारखं दुमडावं. दोन्ही बाजू उघडया असाव्यात. उकळत्या पाण्यात थोडं मीठ घालून 10 ते 12 मिनिटं उकळल्यावर त्यात या करंज्या सोडून 10 मी. झाकून उकळावे. पाण्यातून काढून पाणी निथळून गरम पाण्यावर साजूक तूप खावे किंवा थंड सुद्धा छान लागतात.
उकडीचा मोदक
साहित्य:-
तांदूळाची बारीक पिठी 1 वाटी
ओलं खोबरं 1 वाटी
गूळ अर्धी वाटी
वेलची पूड –
मीठ चिमुटभर
तूप –
तेल 1 चमचा
कृती:-
एक वाटी पाणी गरम करुन चांगले उकळल्यावर त्यात चिमुटभर मीठ व एक चमचा तेल घालावे. त्यानंतर गॅस बंद करुन एक वाटी तांदूळाची पिठी घालावी व वाफ येऊ दयावी. दुस-या भांडयात गुळाचा पाक करुन त्यात ओलं खोबरं व वेलची पूड घालावी. थोडंस परतून गॅस बंद करावा. तांदूळाची पिठी चांगली मळून त्याची हातावर छोटी लाटी घेऊन गोल पसरवावी. त्याला प्रथम बोटाने कळया पाडून मधे तयार खोब-याचे सारण भरावे. नंतर मोदक तयार करुन वाफवून घ्यावा. साजूक तूपाबरोबर खायला दयावा.
पोह्याचे वडे
साहित्य:-
पातळ पोहे 2 वाटी
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
कोथिंबीर 4 चमचे
हळद पाव चमचा
चाट मसाला 1 चमचा
दही 1 वाटी
बेसन अर्धी वाटी
काॅर्नस्टार्च पाव वाटी
कृती:-
दह्यात सर्व साहित्य एकत्र करुन त्यामध्ये मावेल तेवढे पोहे घालून मिश्रण एकजीव करा. नंतर त्याला लांबट छोटया आकाराचे वडे बनवून डीप फ्राय करा. कचुंबर बरोबर खायला दया.
आखल (मेतकूट)
साहित्य:-
फुटाण्याची डाळ अर्धी वाटी
हळद पाव चमचा
मेथीदाणे पाव चमचा
धने पाव चमचा
जीरे पाव चमचा
हिंग पाव चमचा
तयार भात 2 वाटया
फ्रेश क्रीम पाव वाटी
तूप 2 चमचे
कृती:-
सर्व प्रथम मेथीदाणे, फुटाण्याची डाळ, धने, जीरे, हिंग, हळद एकत्र करुन भाजून त्याची पुड करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घाला. एका पातेल्यात तूप गरम करुन त्यात तयार भात व तयार केलेली पुड घालून एकत्र मिसळून घ्या. थोडे गरम झाल्यावर फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकत्र मिसळून घ्या. तयार भाताची मूद पाडून त्यावर पुदीन्याचे पान ठेवून सव्र्ह करा.