धिरडे
साहित्य:-
कणीक 1 वाटी
आंबट दही 3-4 चमचे
जीरे 1 चमचा
मीठ चवीनुसार
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
हिरवी मिरची 3-4
कोथिंबीर –
लसूण पेस्ट अर्धा चमचा
तांदूळाची पीठी 2 चमचे
तेल 2 चमचे
कृती:-
एक वाटी कणीक घेवून त्यामध्ये 3-4 चमचे आंबट दही, जीरे, मीठ, हिंग, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर व अर्धा चमचा लसूण पेस्ट, 2 चमचे तांदूळाची पीठी मिसळून दोस्यासारखे पातळ करा व दोस्याप्रमाणेच तेल टाकून मंद आचेवर धिरडे बनवा.
कुरडयाची भाजी
साहित्य –
कुरडयांचा चुरा 3 वाटया
हळद, तिखट, हिंग चवीनुसार
चिरलेला लसूण 2 चमचे
कांदा अर्धी वाटी
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर 2 चमचे
कृती –
कुरडया पाण्यात भिजवून ठेवा साधारण 1 तास. 4 चमचे तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण, कांदा चांगले परतवून घ्या. नंतर यात चवीनुसार हळद, तिखट घालून भिजवलेल्या कुरडया घाला. चवीनुसार मीठ व साखर घालून चांगले परतून घ्या. गरम पडल्यास एक पाण्याचा शिबका सुद्धा मारा. कोथिंबीर घालून सव्र्ह करा.
ब्राम्हणी पद्धतीची आमटी
साहित्य –
शिजवलेली तुरीची डाळ 1 वाटी
खवलेलं खोबरं पाव वाटी
आमसूल 2-2
कढीपत्ता –
हिरव्या मिरच्या 4-5
हळद, हिंग चवीनुसार
गूळ चवीनुसार
गरम मसाला अर्धा चमचा
मोहरी अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कृती –
3 चमचे तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हळद घालून नतंर त्यात तुरीची शिजलेली डाळ, थोडं गरम पाणी घालून उकळी येवू दया. नंतर यात गूळ, मीठ, आमसूल, ओलं खोबरं घाला. एक उकळी आणा. सर्वात शेवटी गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
व-याचे गोड धिरडे
साहित्य:-
शिजलेली भगर 1 वाटी
पिकलेली केळी 2 नग
गूळ चवीनुसार
वेलची पावडर –
भरडलेले दाणे पाव वाटी
घट्ट नारळाचे दूध अर्धी वाटी
साबुदाणा पीठ अर्धी वाटी
कृती:-
भगर रवीनी घोटून त्यात केळी कुस्करुन घ्या व चवीनुसार गूळ मिसळवा. नंतर यात मिश्रण घट्ट होण्याकरीता साबुदाण्याचे पीठ मिसळवा. एक चिमटी मीठ, वेलची पावडर, दाण्याचे कुट घालून याच्या छोटया छोटया टिकीया बनवा व मंद आचेवर तूूपावर शेकून नारळाच्या दूधाबरोबर खायला द्या.