महत्त्वाच्या घटना
१८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
१९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
१९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.
१९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
१९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न.
१९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
१९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या एलिसन हरग्रिव्हज ह्या पहिल्या महिला बनल्या.
१९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
१९९६: लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
१९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.
२०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
२०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.
२०१६: संत निरंकारी मिशन चे प्रमूख बाबा हरदेव सिंह यांचा कॅनडात रस्ता दुर्घटनेत मृत्यू
२०१७ : जगभर वॉनाक्राय रैनसमवेयरने शंभराहूम अधिक देश प्रभावीत
जन्मदिवस / जयंती
१८५७: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ – लंडन, यू. के.)
१९०५: भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद . (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)
१९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म.
१९१८: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती . (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)
१९२५: दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)
१९५१: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.
१९५६: आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.
१९५६: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.
१९७३: गीतलेखक, कवी संदीप खरे यांचा जन्म.
१९८४: भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.
१९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी . (जन्म: २३ जुलै १८६४)
१९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)
२००१: लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण . (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)
२०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी . (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)
२०१३: भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी .