डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

ठळक घटना

१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
१७३६ : चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.
१८६५ : जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
१९१२ : आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
१९४४ : मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
१९८६ : बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

जन्म/वाढदिवस

१६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स . (मृत्यू: ८ जुलै १६९५)
१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)
१९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर. (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)
१९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा . (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)
१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)
१९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार .
१९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा.
१९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे .

मृत्यू/पुण्यतिथी

१९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर १८७९)
१९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया . (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)
१९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन . (जन्म: ९ एप्रिल १८९३)
१९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी .
२०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका . (जन्म: १ मार्च १९३०)