घटना

१७४२: स्पेन्सर कॉम्प्टन इंग्लंडच्या पंतप्रधानपदी.

१९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१९२३: प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.

१९५९: फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९९८: चायना एरलाइन्स फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.

२०१७: पाकिस्तान सिंध प्रांतात सूफी संत लाल शाहबाज कलंदर दर्ग्यावर १०० लोकांचा मृत्यू

जन्म

१०३२: यिंगझॉँग, चीनी सम्राट.

१२२२: निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.

१७४५: थोरले माधवराव पेशवे.

१८२२: सर फ्रान्सिस गाल्टन,बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणारे.

१८७६: रँगलर परांजपे, हे केंब्रिज विद्यापीठाचा रॅग्लर हा वरिष्ठ किताब पटकावणारे पहिले भारतीय होते.

१९४१: किम जोँग-इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू

१२७९: तिसरा आफोन्सो, पोर्तुगालचा राजा.

१३९१: जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.

१८९९: फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.

१९४४: दादासाहेब फाळके, महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते.

१९५५: मेघनाथ साहा, सुप्रसिध्द शास्त्रज्ञ.