घटना

१९०५: भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.

१९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.

१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

१८१७: विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.

१८८८: ऑटोस्टर्न, परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक.

जन्म

१४८६: चैतन्य प्रभू, बंगालमधील थोर संत.

१७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा.

१८२३: समाजसुधारक व इतिहासकार गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक.

१८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस.

१८७१: केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल.

१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा

१८९८: फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी.

१९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर.

१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर.

१९२६: नंदीसिंह, हॉकी खेळाडू.

१९२६: अभिनेत्री नलिनी जयवंत.

१९२७: संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम.

१९३३: अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी.

मृत्यू

१२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान.

१४०५: मंगोल सरदार तैमूरलंग.

१५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो.

१९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर.

१९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे.

१९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते पंडित गोपीकृष्ण.

२०१४:निखिल बरन सेनगुप्ता (वय ७० वर्ष) भारतीय कला निर्देशक, चित्रकार, अभिनेता