ठळक घटना

१९७: लुग्डुनुमच्या युद्धात रोमन सम्राट सेप्टिमियस सेव्हेरस कडून क्लोडियस अल्बिनसचा पराभव.

६०७: बॉनिफेस तिसरा पोपपदी.

१६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.

१९४६: भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.

२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

जन्म

१४७३: कोपर्निकस.

१६३०: छत्रपति शिवाजी महाराज.

१८९९: बळवंतराय मेहता, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री.

१९०६: माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.

मृत्यू

१९७: क्लोडियस अल्बिनस, ब्रिटनचा रोमन शासक.

१९१५: गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.

२००३: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.