जागतिक सामाजिक न्याय दिवस.
ठळक घटना
१७९२: जॉर्ज वॉशिंग्टन यांनी टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात आले.
१९१३: ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
१९६२: जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
१९८७: मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.
जन्म
१८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन.
१९०१: इजिप्तचे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब.
१९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन.
१९२५: जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका.
१९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन.
मृत्यू
१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे.
१९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली.
१९५०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस.
१९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे.
१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी.
१९९४: मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे.
१९९७: माणूस साप्ताहिकाचे संपादक ग. माजगावकर.
२००१: माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता.
२०१२: संत साहित्याचे अभ्यासक, शोधक डॉ. रत्नाकर मंचरकर.