ठळक घटना

१२९०: इजिप्तचा फेरो राम्सेस दुसर्‍याचा राज्याभिषेक.

१२८१: मार्टिन चौथा पोप पदी.

१२८८: निकोलस चौथा पोप पदी.

१८१९: स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.

१८८९: उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.

१९३१: स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना.

१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१९४८: चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.

१९५४: पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु.

१९७९: सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

जन्म

१४०३: चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.

१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१८५७: रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.

१८८९: ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.

मृत्यू

१३७१: डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

१९२१: सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.

१९४४: महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.

२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे.

२००९: डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.