ठळक घटना
१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ ह्या साप्ताहिकाची सुरूवात.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी वयाने सर्वात लहान जलतरणपटू .
२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना.
२०१३: मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.
जन्म/वाढदिवस
१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे . (मृत्यू: २६ जून २००१)
१९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर .
१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन .
१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन .
१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.
मृत्यू/पुण्यतिथी
१९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी . (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)
१९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई . (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल .
१९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर . (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९९३: साहित्यिक मधुकर केचे (जन्म: १७ जानेवारी १९३२)
२०१४: नन्दा (वय ७५ वर्ष) बॉलीवुड अभिनेत्री