१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.
२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

१६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)
१९५५:पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर –शास्त्रीय गायक, पायोजी मैने रामरतन धन पायो, ठुमक चलत रामचंद्र, चलो मन गंगा जमुनातीर,
ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. सुध मुद्रा, सुध बानी हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)
१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन . (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
१९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी . (जन्म: ८ मार्च १९२१)
२००३: पांडुरंगशास्त्री आठवले –कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य
तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी स्वाध्याय परिवार सुरू केला. त्यांचा जन्मदिन
स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)
२००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर . (जन्म: १४ जानेवारी १९२३)
२०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी . (जन्म: ३ मार्च १९५५)