जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय अत्याचारबळी सहाय्यता दिन/ आंतरराष्ट्रीय अत्याचारबळी सहाय्यता दिन
मादागास्करचा स्वातंत्र्य दिन
सोमालियाचा स्वातंत्र्य दिनमहत्त्वाच्या घटना
१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
१९४५ : युनायटेड नेशन्सची स्थापना.
१९५८ : पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव मंजुर.
१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
१९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६८: पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
१९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड (युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड) लावण्यास सुरूवात झाली.
१९७४ : नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ
१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.
१९७७: एल्व्हिस प्रेस्ली यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.
१९८२ : एअर इंडियाचे पहिले बोइंग विमान गौरीशंकर येथे कोसळले.
१९९९: पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
२०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
जन्मदिवस / वाढदिवस
१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड .
१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर . (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)
१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम थॉमसन . (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)
१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान . (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)
१८७४: छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)
१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व . (मृत्यू: १५ जुलै १९६७)
१८९२: पर्ल एस. बक –नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका. (मृत्यू: ६ मार्च १९७३)
१९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार . (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)
१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर .
मृत्यू / पुण्यतिथी
३६३: रोमन सम्राट ज्युलियन .
१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर . (जन्म: १४ जून १८६८)
१९४४ : प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.
२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे . (जन्म: २५ मार्च १९३२)
२००४: भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर . (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००५: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर. (जन्म: १८ मार्च १९४८)