ठळक घटना
१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.
१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी .
२०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
जन्म/वाढदिवस
१८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
१८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्ही. (मृत्यू: १९ जुलै १९६५)
१८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन . (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)
१८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची . (मृत्यू: २ जानेवारी १९५३)
१८९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर . (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
१९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा . (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)
१९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज.
१९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया.
मृत्यू/पुण्यतिथी
१८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन . (जन्म: १६ डिसेंबर १७७०)
१८८५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर. (जन्म: २० एप्रिल १८२५)
१९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड . (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)
१९९६: चित्रकार के. के. हेब्बर.
१९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड . (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
१९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया . (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
१९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर . (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
२००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
२००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल . (जन्म: १७ जुलै १९३०)
२०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस. (जन्म: १० मे १९४०)