महत्त्वाच्या घटना
एच.आय.व्ही. चाचणी दिन : अमेरिका
१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
१९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू.
१९७७: जिबुटी देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.चिंतामणराव देशमुख पुरस्कार
२०१४: हैदराबाद, आंध्रप्रदेश गॅस पाइपलाइनच्या स्फोटात चौदा जणांचा मृत्यू आणि बरेच जण जखमी
जन्मदिवस / वाढदिवस
१४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)
१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)
१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय –बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या
आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)
१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)
१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)
१९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)
१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९१७ : खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)
१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)
हेलन केलर
मृत्यू / पुण्यतिथी
१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव .
१८३९: सिख,पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
१९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली. (जन्म: ५ एप्रिल १९०९)
१९९८: होमी जे. एच. तल्यारखान –गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले .
२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णन कंत . (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
२००८: सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. (जन्म: ३ एप्रिल १९१४)