मातृ दिन : बॉलिव्हिया.
बाल दिन : नायजेरिया.महत्त्वाच्या घटना
१७०३ : झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली
१८१३ : १८१२चे युद्ध – अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट जॉर्ज किल्ला जिंकला.
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
१८९६ : अमेरिकेच्या सेंट लुईस शहरात एफ.४ टोर्नेडो. २५५ ठार.
१९०५ : त्सुशिमाची लढाई.
१९०७ : सान फ्रांसिस्को मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव.
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
१९२७ : फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले.
१९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्घाटन झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.
१९५१: मुंबईतील प्रसिध्द तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
१९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवो मध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
२००६ : जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.
२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
जन्मदिवस / वाढदिवस
१९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद . (मृत्यू: ११ मे २००४)
१९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर.
१९३८: कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे.
१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.
१९६२: भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.
१९७५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी .
१९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने .
मृत्यू / पुण्यतिथी
१९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच . (जन्म: ११ डिसेंबर १८४३)
१९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम . (जन्म: १६ एप्रिल १८४८)
१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.
१९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)
१९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.
१९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)
१९९४: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक.. (जन्म: २७ जानेवारी १९०१)
१९९८: अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी . (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)
२००७: हॉट एअर बलून चे निर्माते एड यॉस्ट . (जन्म: ३० जून १९१९)