३१२: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
१९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
१९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.
१९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
१९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
१९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर . (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)
१७९५: पेशवा सवाई माधवराव . (जन्म: १८ एप्रिल १७७४)
१९३७: संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ –किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
१९६४: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)
१९७४: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)
१९८७: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)
२००१: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२५)
२००१: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र
तथा भा. रा. भागवत यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९१०)
२००७: हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.
२०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
२०१८: मदन लाल खुराना ,भारतीय जनता पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री (१९९३–१९९६),राजस्थानचे राज्यपाल (२००४) (जन्म: १५ ऑक्टोबर, १९३६)