१४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
१९४२:एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले.
यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.
१९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.
१९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.
१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
१९८८:बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला होत.
१९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
२००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)
१९०६: बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे,
विज्ञानप्रसारक, लेखक (जन्म: २१ मार्च १८४७)
१९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)
१९९६: एम. चेन्‍ना रेड्डी –आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ –१९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ –१९८३),
राजस्थानचे राज्यपाल (१९९२ –१९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ –१९९६) (जन्म: १३ जानेवारी १९१९ –पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)
२०१४: देवेन वर्मा , भारतीय फ़िल्म अभिनेता.( जन्म.: २३ ऑक्टोबर, १९३७ )
२०१४: अब्दुल रहमान अंतुले , राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. (१९८०-१९८२)( जन्म.: ९ फेब्रुवारी, १९२९ )