घटना

९६२: पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.

१११९: कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.

१६५३: अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.

१८४८: ग्वादालुपे हिदाल्गोचा तह – मेक्सिको व अमेरिकेची संधी.

१८७८: ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.

१८८०: अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.

१९२५: कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.

१९३३: ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.

१९५७: सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्‍याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.

१९८९: अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.

१९९०: कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून मुक्ततता झाली.

जन्म

१२०८: जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.

१४५५: जॉन, डेन्मार्कचा राजा.

१६४९: पोप बेनेडिक्ट तेरावा.

१८८२: जेम्स जॉईस, आयरिश लेखक.

१८८४: डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ

१९७७: शकिरा, प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका.

मृत्यू

१२५०: एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.

१३१४: संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली.

१४६१: ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.

१७६९: पोप क्लेमेंट तेरावा.

१९०७: दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे जनक.

१९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.

१९७०: बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.

२००७: विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.