१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.
१९३९: दुसरे महायुद्ध –जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
२०१६:उज़्बेकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्लाम करिमोव यांचं निधन

१५४०: इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) .
१८६५: आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन.
१९३७: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन . (जन्म: १ जानेवारी १८६३)
१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर.
१९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह . (जन्म: १९ मे १८९०)
१९७६: विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर –मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी कुमार या टोपणनावाने कविता लेखन
तर आदर्श या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ययाति या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (जन्म: १९ जानेवारी १८९८)
१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर –निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास (जन्म: ३ आक्टोबर १९०७)
१९९९: डी. डी. रेगे –विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले
चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ –पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)
२००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी याचं विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)
२०११: संगीतकार श्रीनिवास विनायक खळे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळे अण्णांनी
जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. (जन्म: ३० एप्रिल १९२६)
२०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती . (जन्म: ७ मे १९४९)