जपान – बुद्धाचा जन्मदिवस.

जागतिक रोमा (रोमनियन) दिवस.

घटना

१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले.

२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

जन्म/वाढदिवस

१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

१९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई. (मृत्यू: ६ मार्च १९९२)

१९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान.

१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी.

मृत्यू/पुण्यतिथी

१८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)

१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी . (जन्म: २७ जून १८३८)

१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर. (जन्म: १६ मे १८५०)

१९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

१९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)

१९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक. (जन्म: २४ जून १८९९)

१९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर.

२०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)

२०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)