१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.
१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
१९३९: म्युनिक येथे अॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.
१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना.
१९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.
१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.
२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१५:बिहार विधान सभा निवडणुकांमध्ये जनता दल (यूनाइटेड), राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महागठबंधन विजयी झाले.
२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.
२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.