घटना

१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.

१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.

१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

जन्म/वाढदिवस

१३३६: मंगोल सरदार तैमूरलंग. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)

१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक.

१८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका. (मृत्यू: २५ जुलै १८८०)

१८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)

१८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)

१९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)

१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन.

१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी

.

मृत्यू/पुण्यतिथी

इ.स. पूर्व ५८५:जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)

१६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)

१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.

१९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव.

१९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते. (जन्म: २२ जून १९०८)

२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)

२००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात. (जन्म: ११ जुलै १९२१)

२००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत. (जन्म: १३ जानेवारी १९२६)

२००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे.