ठळक घटना

१९३५: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या बी. २९ बॉम्बफेकी विमानांनी जपानची राजधानी टोक्योवर तुफान बॉम्बहल्ले केले. १,००,०००पेक्षा अधिक मृत्युमुखी.

१९५२: पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन.

१९५९: बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.

१९८२: सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग.

२००६: एन्सेलाडस या शनिच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.

जन्म/वाढदिवस

१८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)

१८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

१८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

१९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म

१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

१९३४: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)

१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

१९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

१९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

१८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१८८८: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७)

१९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)

१९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १९०८)

२०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)

२००३: बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.

२०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

२०१८: पतंगराव कदम (वय ७४ वर्ष) भारतीय राजकारणी