विनोद वल्ली

पाटील आणि बंड्याभाऊ पहिल्यांदा मुंबईत आले, ठरवल्याप्रमाणे जीवाची मुंबई करायला पंचतारांकित हॉटेलमध्ये लंचसाठी गेले…

आधी जरा चहा मागवुन बघु राव, असा खर्ड्या आवाजात बोलुन पाटलांनी चहाची ऑर्डर वेटरला दिली. त्याने पाणी, शुगर क्युब्स, टी सॅशे आणि कप आणुन ठेवले… पाटलांनी आणि बंड्याभाऊनी चहाची कृती आठवत बनवुन घेतला निमुटपणे!

थोड्या वेळाने वेटरने येऊन जेवणाच्या ऑर्डरबद्दल चौकशी केली… पाटलांनी तणावमुक्त चेहर्‍याने उत्तर दिले –

‘भाऊ, बिर्यानी सांगायचा बेत होता हो… तुम्हीं भाज्या आणि तांदुळ द्याल पण बनवता नाही येत!’

विनोद वल्ली

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

.

.

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..

.

.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.

.

.

.

मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता…

विनोद वल्ली

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,”प्रेम काय आहे???”

.

हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,

.

“हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.

.

हे आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न मला नको विचारू….”

विनोद वल्ली

आजचा उपदेश :

जर कोणी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर…

.

.

.

आपण पण त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला”दोन”

कड्या असतात…

विनोद वल्ली

जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले…..

असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले…..

.

.

.

असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,

आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!

.

.

विचार करा….

.

.

६०० रूपयांचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले….

…..नाद नाही करायचा #मराठी इंजिनियर्स चा……

विनोद वल्ली

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.

नवरा गाढ झोपेतून

खडबडून जागा होतो.

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.

विनोद वल्ली

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला

नसता… कारण बायकोने विचारले असते…

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

काय शोधायला जाताय?

…इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मित्र बरोबर असतीलच ना?

दारू रोज ढोसणार का?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात…

विनोद वल्ली

पप्पा – आज चिकन आणलाय पण

लिंबू नाही …

.

.

.

झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००

लिंबांची शक्ती आहे तेच टाका दोन थेंब.

विनोद वल्ली

जगातील काही नमुने असलेली लोकं.

१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.

२. जे फ़ेसबुकवर स्वत:च्या पोस्टला स्वत:च लाईक करतात.

३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्‍या मेल आयडि वर स्वत:च मेल पाठवतात आणि

४. मराठी जे महाराष्ट्रात राहुन मराठी लोकांशी हिंदीत बोलतात!

विनोद वल्ली

रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.

विनोद वल्ली

भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते.

.

.

एक भिकारी आला , प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि ऑटो मध्ये निघून गेला…

विनोद वल्ली

आयुष्यात कधी पाय डगमगला , कधी पडलो पण हिम्मत नाही हारलो,

पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला….

.

.

.

.

वेटर अजून १ खंबा आण…………. …..!!!!!!!!

विनोद वल्ली

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो….

..

..

..

कंजूस काटा काढत स्वत:शीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.

विनोद वल्ली

झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले

.

.

प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?

.

.

झंप्या : काल रात्री माझ सूप ३ तास झाले तरी संपेना तेंव्हा…

विनोद वल्ली

प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.

ते पाहून एका माकडाने विचारले: ” ओ वाघोबा! …एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?”

वाघ: ” अरे मारू नाहीतर काय….?

अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,

” एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!”

“मग… माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका……… लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका…!!

विनोद वल्ली

बायको – तुम्ही सारख सारख माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता.?

जे काय बोलायचं ते मला बोला.

.

.

नवरा=हे बघ टिव्ही खराब होतो,तेव्हा आपण टिव्ही ला काही बोलतो का ? शिव्या तर कंपनीला च देतो ना…

विनोद वल्ली

नातु: आज्जी मी रनींग रेस मध्ये भाग घेतलाय..  आशिर्वाद दे मला

आज्जी: सावकाश पळ रे बाबा!!

विनोद वल्ली

पाकिस्तानी राजकीय नेते सतत ओरडतात की

“आम्ही भारताच्या ताब्यातून पूर्ण काश्मिर घेऊ…”

इथ आम्ही आमच्या वर्गातली पोरगी दुसर्‍या वर्गातल्या पोराला पटवू देत नाही… आणि हा काश्मीर मागतोय..