- तिथी :
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
- पार्श्वभूमी :
आपल्या हिंदुस्तानाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन (गणराज्य दिन) म्हणून साजरा केला जातो.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
तिरंगा म्हणजे आपली शान… प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजास गौरवले जाते. शाळा कॉलेज मधुन, कार्यालयांमधुन, विविध रहिवाशी संकुलांमधुन झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कवायती – भाषणे – राष्ट्रगौरवपर गीत इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
- वैशिष्ट्य :
प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यावरून माननीय पंतप्रधान देशवासीयांना उद्देशून भाषण करतात. भाषणात गतवर्षाचा आढावा घेत आगामी योजना जाहीर केल्या जातात. विशेष आकर्षण म्हणजे देखणं संचलन… तसेच स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हिंदुस्तानी हा राष्ट्रीय सण मोठ्या अभिमानाने साजरा करतात.