- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
- अंथरूण पाहून पाय पसरावे
- अक्कल खाती जमा.
- अग अग म्हशी, मला कुठे नेशी.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवा
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- असतील मुली तर पेटतील चुली.
- आंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
- आधी पोटोबा मग विठोबा
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- उंटावरचा शहाणा
- उंटावरून शेळ्या हाकणे
- एका हाताने टाळी वाजत नाही
- कर नाही त्याला ड़र कशाला?
- करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
- करावे तसे भरावे.
- कळते पण वळत नाही.
- कशात काय अन फाटक्यात पाय.
- कष्ट करणार त्याला देव देणार.
- काखेत कळसा गावाला वळसा
- काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
- कामापुरता मामा
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
- कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
- कोल्हा काकडीला राजी
- खायला काळ भुईला भार
- गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
- गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.
- गाढवाला गुळाची चव काय
- गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
- घोडामैदान जवळ आहे
- चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
- चांदणे चोराला, उन घुबडाला.
- चांभाराची नजर जोड्यावर.
- चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
- चुकलेला फकीर मशिदीत.
- चोर तो चोर वर शिरजोर.
- चोर नाही तर चोराची लंगोटी.
- चोर सोडून संन्याशाला सुळी.
- चोराच्या उलट्या बोंबा.
- चोराच्या मनांत चांदणं.
- चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
- चोरावर मोर.
- चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
- छत्तीसचा आकडा
- जशास तसे.
- जशी कामना तशी भावना.
- जशी देणावळ तशी धुणावळ.
- जशी नियत तशी बरकत.
- जसा गुरु तसा चेला.
- जसा भाव तसा देव.
- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
- जावयाचं पोर हरामखोर.
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
- जिकडे सुई तिकडे दोरा.
- जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
- जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
- जो श्रमी त्याला काय कमी.
- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
- ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
- झाकली मूठ सव्वा लाखाची
- डोंगर पोखरून उंदीर कढणे
- तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
- तहान लागल्यावर आड खणणे.
- ताकापुरते रामायण.
- तेरड्याचा रंग तीन दिवस
- तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार
- दुष्काळात तेरावा महिना
- नव्याचे नऊ दिवस
- नाकापेक्षा मोती जड होणे
- नाचता येईना अंगण वाकडे
- नाव मोठे लक्षण खोटे
- नावडतीचे मीठ अळणी
- पाण्यात राहून माशाशी वैर
- पायीची वहाण पायी बरी
- पालथ्या घड्यावर पाणी
- पी हळद हो गोरी
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
- भरंवशाच्या म्हशीला टोणगा
- मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
- मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
- रात्र थोडी सोंगे फार
- वरातीमागून घोडे
- वासरात लंगडी गाय शहाणी
- शेरास सव्वाशेर
- हपापाचा माल गपापा
मराठी सुविचार मराठी उखाणे
Scroll to top