घटना

१४५१: महमद तिसरा ऑट्टोमान सम्राटपदी.

१४८८: बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.

१६९०: मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.

१७८३: अमेरिकन क्रांती – स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.

१८०९: अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.

१८६७: जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.

१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.

१९१३: अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.

१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.

१९२५: भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.

१८३२: रामोशी उमाजी नाईक यांना फ़ाशी दिली.

१९४२: दुसरे महायुद्ध – नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.

१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला.

१९६६: सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.

१९७२: जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१९८४: स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.

जन्म

१९२४: कुझे विल्स, अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञ.

१८३०: रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८८७: हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.

१९२०: हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.

१९३४: काशिक हरपाल, उत्कृष्ट हॉकीपटू.

१९६३: रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.

मृत्यू

१०१४: स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा.

१११६: कोलोमान, हंगेरीचा राजा.

१४५१: मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट.

१४६८: योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.

१८३२: उमाजी नाईक, महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक.

१९२४: वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.

१९८५: फ्रँक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

२००५: झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.